Pune Crime news Chakan Crime minor Boy Killed his Friend and post Full Video On instagram marathi crime news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चाकण, पुणे : पुण्यातील चाकणमध्ये   (Pune Crime News)अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हिडीओ ही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ही ठेवला आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली.

शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेलं आहे. मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेवले.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

या हत्येचा व्हिडीओ त्या दोघांनी बनवला, यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसत असून, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टेट्सवर ठेवण्यात आल्याचं ही समोर आलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याआधारे चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे.

गुन्हेगारीत आता अल्पवयीन मुलं?

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले आणि मारहाण, दहशतीचे प्रकार सर्रास घडत आहे. या शहरातील गुन्हेगारीचा परिणाम अल्पवयीन मुलांवर होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ही गुन्हेगारी वृत्ती थेट अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. अल्पवयीन मुलंदेखील गुन्हेगारीत आता दिसू लागली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पोलिसांकडून ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आता ही गुन्हेगारी शाळांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी थांबवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कोयता गॅंग किंवा पुण्यातील लहान मोठ्या टोळ्यांमध्येही आता अल्पवयीन आणि विशीतील मुलं दिसत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांवर काटेकरपणे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts