Venus will transit 2 times in March These signs can get benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Venus Planet Transit In Kumbh And Meen: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे गोचर शुभ परिणाम देणारं असतं. ज्योतिष शास्त्रानुसार, धन-समृद्धी देणारा शुक्र हा मार्चमध्ये दोनदा भ्रमण करणार आहे. 

पुढच्या महिन्यात म्हणजेच 7 मार्चला शुक्र प्रथम कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर शनिदेवाचं प्रभुत्व आहे, त्यानंतर 31 मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मार्चमध्ये शुक्राचे दोन वेळा होणारं गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. त्यामुळे काही राशींचे नशीब या काळात चमकू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

तुमच्या लोकांसाठी शुक्राच्या राशीत बदल लाभदायक असणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्न आणि बाराव्या भावात जाणार आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतील. सुखसुविधांमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. या वेळी तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. कुठूनतरी आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.  तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर सर्व गैरसमज दूर होतील. यशाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. 

मकर रास (Makar Zodiac)

शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात जाणार आहे. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तुमच्या कामात नेहमी उत्साही राहाल. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts