Clashes Between varsha gaikwad and bjp mla during assembly session over development projects in mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Varsha Gaikwad Vs Ashish Shelar :मुंबईतील विकासकामांवरुन वर्षा गायकवाड आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी

Maharashtra Assembly Session : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. मुंबईतील प्रश्नांवर बोलताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, मुंबई महापालिका (BMC) स्वायत्तता आहे का की, दोन पालकमंत्री ऑफिस टाकून बसले आहेत. मुंबईत सध्या श्वसनाचे आजार झाले आहेत. ही परिस्थिती कोणामुळे आली आहे. आशिष शेलार यांनी राजकीय भाषण केलं. मुख्यमंत्री म्हणाले होते, सर्व रस्ते सिमेंट काँक्रेटचे होतील.

काँग्रेस आणि भाजप आमदारांत जोरदार खडाजंगी

सात हजार कोटींचं काम पण, काम काहीच झालं नाही. मान्सून सुरु झाला तर रस्त्याची अवस्था काय होणार, रस्त्याचं टेंडर कोणाला मिळालं सर्वाना माहित आहे. आपल्या मित्राला टेंडर कस मिळेल ही सरकारची भूमिका असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे. वर्षा गायकवाड यांच्या भाषणावर भाजप आमदारांनी आक्षेप घेतला. वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नांवर बोलावं त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करू नये, असं म्हणत भाजप आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

[ad_2]

Related posts