Bhayandar : उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्यानमारच्या 8 नागरिकांना अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhayandar : उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्यानमारच्या ८ नागरिकांना अटक</p>
<p>उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्यानमारच्या ८ नागरिकांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळ भारत देशात वास्तव करण्यासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रं नव्हती. २६ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता भाईंदर उत्तनच्या चौकगाव जेट्टीजवळ ८ जणांचा घोळका बसला होता. तेवढ्यात उत्तन सागरी पोलीस त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताब्यात घेतलं असता हे सर्वजण अवैध पद्धतीने देशात घुसल्याचं उघड झालंय. भारतात आणण्यासाठी त्यांना कुणी मदत केली..?ते भारतात कसे आले&hellip;? भारतात येण्या मागचं कारण काय..? याबाबत आता उत्तन सागरी पोलीस तपास करत आहे. गुजरातच्या पोरबंदर समुद्रात साडेतीन हजार किलो ड्रग्जचा साठा पकडलाय. त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस कसून तपास करत आहेत. त्या दरम्यान उत्तन भागात पेट्रोलिंग करताना हे आठ जण पकडण्यात आले.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts