Pune Crime News Boy vendalised 8 vehicle in mundhwa area

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत (PUNE CRIME)  आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहे. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. तर कधी थेट रस्त्यांवर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे.  त्यातच सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील मुंढवा भागात आरोपींनी धुडगूस घातला आहे. दारूच्या नशेत आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड केली आहे.

हा सगळा प्रकार समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्यांनी आरोपीला शोधलं आणि त्याला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून येरवडा आणि मुंढवा परिसरात अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच परिसरात दहशत माजवल्याचं समोर आलं आहे. या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचं नुकसान झालं आहे. 

कालच पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.  येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणाकडून वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी  येरवडा पोलिसंकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली होती. अजय चित्रगुप्त बागरी,सुमीत भारत सितापराव असं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे होती. मध्यरात्री येरवडा भागात ही घटना घडली होती.

प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर

पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली असून ती थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर, अशा लहान मोठ्या टोळ्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना आधीच आदेश काढून कारवाई करण्याय येणार असल्याची तंबी दिली आहे. त्यासोबतच कोयता गॅंग किंवा तोडफोड करणाऱ्या टोळीची धींडदेखील काढण्यात आली होती. ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरात धींड काढली होती. मात्र तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सगळे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची  प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची डिजीटल नजर देखील असणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Ramesh Pardesi drugs Video : मदत करणं गुन्हा आहे का?, I Support Ramesh Pardesi!, पिट्या दादासाठी सोशल मीडियावर पोस्ट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts