Zero Hour MVA Seat Sharing Formula Meeting amid lok sabha elections

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour : महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा पूर्ण? काय फॉर्म्युला ठरला?

महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा आटपली. त्यात आधीचे तीन पक्ष चार झाले. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सशरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी पण जागांच्या हिस्सेदारीत सामील आहे. हे सर्व जरी नेते मंडळी सांगत असली, तरी एक गोष्ट ते सांगत नाहीयेत. आणि तो म्हणजे जागावाटपाचा फॉर्म्युला. म्हणजे मग नक्की ठरले तरी काय हा सवाल विचारला तर उत्तर आहे. जिंकून येण्याची क्षमता. त्यात मविआतील अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॉर्म्युला हा येत्या दोन दिवसांमध्ये पक्का होईल. कालच्य़ा बैठकीत वंचितनं राज्यातील २७ लोकसभा मतदारसंघात आपला प्रभाव असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांनाही किती जागा मिळणार. याकडेही आपलं लक्ष असणारय. मविआच्या जागावाटपाची सविस्तर चर्चा करणार आहोतच.. मात्र, त्याआधी पाहुयात आजचा दुसरा प्रश्न.

[ad_2]

Related posts