India tour west indies Full Schedule Declared ; भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या पराभवानंतर आता भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ तब्बल एक महिना वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असेल. पण सर्वात महत्वाचे म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने आता अमेरिकेतही खेळवण्यात येणार आहेत.


क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने सोमवारी आगामी भारत दौऱ्यासाठी २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ T20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून भारताचा वेस्ट इंडिज दौरा दोन कसोटी सामन्यांनी सुरू होणार आहे. डॉमिनिकामधील विंडसर पार्क येथे १२ ते १६ जुलै दरम्यान पहिल्या कसोटी सामन्याचे आयोजन करणार आहे. दुसरा आणि अंतिम सामना हा या दोन्ही संघांमधील १०० वा कसोटी सामना असेल. हा सामना २० जुलैपासून त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू होईल.

या दौऱ्याची घोषणा करताना, क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह म्हणाले, ” भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करत असताना आम्हाला आनंद होत आहे. कारण भारताबरोबर आमचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळेच दोन्ही देशांतील १०० वा कसोटी सामना खेळवण्याचा योग आमच्या नशिबात आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १०० वा कसोटी सामना हा क्वीन्स पार्क ओव्हलवर रंगणार आहे. हा सामना आमच्यासाठी खास असेल आणि चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी असेल. या दौऱ्यातील काही सामने अमेरिकेतही खेळवण्यात येणार आहेत.”

भारताचे या दौऱ्यातील दोन टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील चौथा टी-२० सामना हा १२ ऑगस्टला फ्लोरिडा येथे होईल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ ऑगस्टला दोन्ही देशांतील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना हा याच ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या दौऱ्यातील हे दोनच सामने फक्त अमेरिकेत खेळवण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारताचा हा दौरा तब्बल एका महिन्याचा असणार आहे.



[ad_2]

Related posts