Devendra Fadnavis and Vishwajeet Kadam conversation outside Vidhan Bhavan boost speculation of Vishwajeet Kadam joining BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील काँग्रेस आमदारांची एक फळी त्यांच्यासोबत जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. योग्य ती वेळ साधून भाजपकडून काँग्रेसच्या या आमदारांना आपल्या गटात ओढले जाईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला होता. याच दाव्याला बळ देणारी एक घटना शुक्रवारी विधिमंडळाच्या आवारात घडली. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील संवाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस विश्वजीत यांना उद्देशून म्हणाले की, ‘विश्वजीत थांब, लवकरच तुझा मुहूर्त लावतो’. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे आता विश्वजीत कदम हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवट झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज संपवून विधिमंडळ परिसराच्या बाहेर पडत होते. त्यांच्या अवतीभोवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा जत्था होता. हे आमदार फडणवीसांशी बोलत होते. त्याचवेळी मागच्या घोळक्यातून वाट काढत विश्वजीत कदम पुढे आले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला. फडणवीस घाईत असल्यामुळे पुढे चालत राहिले. तेव्हा विश्वजीत कदम यांनी झटकन त्यांच्या बाजूला येत बोलायला सुरुवात केली. या दोघांमध्ये काही चर्चा झाली. त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजीत कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पुढील काहीवेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरु होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले. परंतु, आता या दोघांमधील वार्तालापाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर?

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत काँग्रेसचे आठ ते दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. या संभाव्य फुटीर आमदारांच्या यादीत विश्वजीत कदम यांचे नावही समाविष्ट होते. विश्वजीत कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या दबावापोटी विश्वजीत कदम भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा अधुनमधून सुरु असते. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा ती चर्चा सुरु झाली. मात्र, विश्वजीत कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, आता थेट देवेंद्र फडणवीस यांनीच ‘मुहूर्त’ काढण्याची भाषा केल्याने विश्वजीत कदम खरोखरच भाजपमध्ये जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची रणनीती

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts