Rohit Sharma Slams ICC On Shubman Gill Case After WTC Final 2023 ; शुभमन गिल प्रकरणावर रोहित शर्मा भडकला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : शुभमन गिलला मैदानात पंचांच्या निर्णयाचा फटका बसला आणि त्यानंतर आयसीसीनेही त्याला फटकारले. गिलवर अन्याय झाला, अशी चर्चा सध्याच्या घडीला सुरु आहे. पण या प्रकरणावर आता रोहित शर्माने मौन सोडले आहे. रोहित यावेळी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आणि त्याने रागाच्या भरात आयसीसीला चांगलेच सुनावले आहे.गिल वादग्रस्त पद्धतीने बाद झाला, हे निश्चित. पण त्यानंतर गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्याला झेल नेमका कसा पकडला गेला, हे दाखवण्यात आले होते. एका पद्धतीने गिलने पंचांवर टीका केली होती. त्यामुळे ही गोष्ट आयसीसीला खटकली आणि त्यांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली. आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर १५ टक्के दंड आकारला आहे. त्यामुळे गिलला सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम द्यावी आयसीसीला दंडाच्या रुपात द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टीवर रोहितने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माने सामना संपल्यावर यावर भाष्य केले. तो म्हणाला की, ” हा प्रकार खरंच दुर्देवी आहे. कारण जेव्हा हा झेल पाहिला जात होता, तेव्हा घाई करण्यात आली. जर थोडावेळ अजून जर बारकाईने पाहण्यात आले असते तर नेमकं काय घडलं ते समजता आले असते. माझ्यामते हा झेल पाहण्यासाठी अजून कॅमेरे हवे होते. कॅमेराच्या वेगळ्या अँगलने हा झेल पकडला आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले असते. पण तसे मात्र घडले नाही आणि त्याचा फटका यावेळी गिलला बसल्याचे पाहायला मिळाले.” रोहितने यावेळी आयसीसी आणि पंचांवर थेट टीका करणे टाळले. पण रोहितने यावेळी कॅमेरांचा विषय काढत आयसीसीवर आपला राग काढला आहे. कारण एवढी मोठी फायनल खेळवली जात असताना आयसीसी साधे कॅमेरेही व्यवस्थित लावू शकत नाही, असे रोहितने यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

रोहितने यावेळी या प्रकरणी आपला राग आयसीसीवर काढला आहे. पण रोहितने थेट टीका करणे यावेळी काढले आहे.

[ad_2]

Related posts