Baramati Namo Rajgar Melava CM Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Sharad Pawar Supriya sule maharashtra Politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Namo Rajgar Melava : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या आज दौऱ्यावर येत आहेत. नमो रोजगार मेळाव्याचे निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर असून त्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील आज उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या वादानंतर, या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार का हा प्रश्न कायम आहे. 

नमो रोजगार मेळावा

पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामती आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. पण या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला शरद पवारांना या कार्यक्रमाच्या निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने सारवासरव करत नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचंनाव नमूद केलं. त्यानंतर आता आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर

येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. 

बारामती बस स्थानक आणि पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन

या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे.

नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार?

बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे, ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांना निमंत्रण नसल्याने टोला लगावला होता. 

आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत. तसेच, पाच जिल्ह्यातील युवक युवती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला तरी या कार्यक्रमात राजकीय भाषणं होणार आणि यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच जर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर या कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून जाईल.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts