Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Young Man Committed Suicide By Jumping Into Dam Incident In Chhatrapati Sambhaji Nagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील भटाणा धरणात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोमवारी (15 मे) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नामदेव श्रावण सोनवणे (वय 32 वर्षे) असे मृताचे नाव असून ते भटाणा येथील जावई असल्याचे समजते. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नामदेव यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव सोनवणे यांची भटाणा ही सासरवाडी आहे. त्यांनी सोमवारी धरणामध्ये उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान, आज सकाळी प्रेत तरंगत असल्याची माहिती शिऊर पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप पाटील, फौजदार तिलौकचंद पवार, जमादार संभाजी आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. मयतावर शिऊर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून, प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोनवणे यांनी सासुरवाडीत येऊन आत्महत्या का? केली याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास शिऊर पोलिसांकडून केला जात आहे. 

कर्जबाजारी व्यवसायकाची हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या 

दुसऱ्या एका घटनेत कर्जबाजारी झालेल्या देवगाव रंगारी येथील बाबासाहेब कचरू आमराव (वय 38 वर्षे) व्यापाऱ्याने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. हर्सूल तलावात सोमवारी दुपारी एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती हर्सल पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस नाईक सय्यद सलीम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणास बेशुद्धावस्थेत बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केले. तर पोलिसांनी तरुणास बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

मयताच्या खिशातील आधार कार्डवरून मृत हा देवगाव रंगारी येथील बाबासाहेब कचरू आमराव (वय 38 वर्षे) असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ नातेवाइकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बाबासाहेब आमराव हा ऑनलाइन व्यवसाय करत होता. कर्जबाजारी झाल्याने तो नेहमी तणावात राहत होता. तीन दिवसांपासून घरातून निघून गेला होता. त्याला दोन मुले आहेत. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

पप्पा, हुंड्यासाठी मारहाण होतेय…वडिलांशी बोलून मुलीने घेतला गळफास; बीडमधील दुर्देवी घटना

[ad_2]

Related posts