PCMC Crime News PSI vikas shelke arrested with rs 45 crore md pune drug case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PCMC Drugs : पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या (Drugs) मेफेड्रोन ड्रग्स (PCMC News) प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलंय. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीला अजूनही आळा बसलेला नाही अशीच स्थिती समोर येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन आढळलं होतं.  ज्याची किंमत 2 करोड 38 लाख आहे. पिंपळे निलखमधल्या रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आणि नमामी शंकर झा अस अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. या ड्रग्स रॅकेट ची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय..

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts