Viral Video Wrestler Sangeeta Phogat Lifts Yuzvendra Chahal on Her Shoulder Spins Him

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 Yuzvendra Chahal Viral Video :  झलक दिखला जा रॅप-अप पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर युझवेंद्र चहलला कुस्तीपटू संगीता फोगटने खांद्यावर उचलून घेत भिंगरीसारखा घुमवल्याचा तो व्हिडिओ आहे. संगीता फोगटे भिंगरीसारखा घुमवल्यानंतर चहलची भंबेरी उडाल्याचे चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे संगीताला तो थांबवण्याची विनंती करतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा झलक दिखला जा या शोमधील पाच फायनलिस्टपैकी एक होती.

चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण  अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात. 

चहलला वार्षिक करारातून वगळले 

दरम्यान, चालू हंगामासाठी BCCI सोबतचा करार गमावलेल्या सात क्रिकेटपटूंमध्ये चहलचा समावेश आहे. चहल यापूर्वी 2022/23 हंगामासाठी वार्षिक करारामध्ये C श्रेणीचा भाग होता. या निर्णयावर आश्चर्यचकित होऊन, भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने अजित आगरकर आणि त्यांची समिती इतर फिरकी पर्यायांकडे पाहत असल्याचे म्हटले होते. 

तो म्हणाला की, युझी चहलचे नाव तेथे नाही याचे मला थोडे आश्चर्य वाटते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन  नावे नसणे, मी समजू शकतो. अगदी दीपक हुड्डाही, पण चहलचे नाव तेथे नसणे काय कारण होते? ते वेगळ्या दिशेने पाहत असल्याचे सूचित होते. 
मात्र, चहलच्या सर्व आशा संपलेल्या नाहीत. चहल येत्या आयपीएल 2024 च्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी दिसणार आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळू शकते. 2022 मध्ये चहलला यापूर्वी 2021 T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts