हवामानाच्या बदलामुळे मुंबईत गारठा वाढला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रविवारी सायंकाळपासूनच शहरातील किमान तापमानाच काही अंशांची घट नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्यामुळं तो थेट शहरातील वातावरणावर परिणाम करताना दिसत आहे. ज्यामध्ये बाष्पयुक्त थंड वारे वाहत असून पुढच्या 24 तासांमध्ये दिवसभर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, तापमानातही गेल्या 24 तासांप्रमाणंच घट नोंदवली जाऊ शकते. 

पुढील 24 तासांसाठी, शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहिल. कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल आणि किमान तापमान 20 डिग्री सेल्सियसच्या जवळपास असेल.

त्यानंतरच्या 48 तासांच्या कालावधीत मुख्यतः स्वच्छ आकाशाकडे शिफ्ट अपेक्षित आहे. या कालावधीत, तापमान 31°C आणि 19°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, हिमालयीन परिसरासोबतच उत्तर भारतात पश्चिमी झंझावात सक्रिय आहे. वारे अरबी समुद्रावरून प्रवास करत आता मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे ज्यामुळं रविवारपासून शहरातील वातावणात गारठा पाहायला मिळत आहे. 

Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये एक पश्चिमी झंझावात पूर्वेच्या दिशेनं पुढे जात कमकुवत होणार आहे. परिणामस्वरुप देशाच्या मैदानी  भागांमध्ये यामुळं पावसाची शक्यता आहे. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. 8 मार्च रोजी हवामानाच्या या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हेही वाचा

<h1 class="push-half–bottom text-capitalize ml-font-black ml-story-pos" data-href="https://www.mumbailive.com/mr/environment/now-air-related-complaints-can-be-made-on-bmcs-mumbai-air-app-82830" data-title="वायू प्रदूषणाबाबत वायू प्रदूषणाबाबत Mumbai Air अॅपवर करता येणार तक्रार


अंधेरीत BMC ची झाडे लावा मोहीम जोमात

[ad_2]

Related posts