[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबईत पुढील काही दिवस फुड डिलिव्हरी सर्व्हिसवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीसोबत जोडले गेलेल्या कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. यामुळं मुंबईतील काही परिसरात स्विगीच्या सेवांवर परिणाम झाला आहे.
आंदोलनामुळं इन्स्टामार्ट डिलिव्हरीला देखील फटका बसला आहे. 8 ऑक्टोबरपासून स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा संप सुरू आहे.
राष्ट्रीय कर्मचारी सेनेने सर्वात पहिले आंदोलनाचे हत्यार उपसले होते त्यानंतर अन्य काही डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी स्विगीविरोधात वांद्रे येथे आंदोलनासाठी जमले होते. या विरोधानंतर मुंबईतील अन्य परिसरातही स्विगीविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं.
डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात आंदोलन केली आहेत. CNBC-TV18च्या रिपोर्टनुसार, कमी वेतन आणि काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी, या मागणीसाठी स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयनी आंदोलनासाठी उतरले आहेत.
वर्ल्डकप सुरू असतानाच ऑर्डरमध्ये वाढ होण्याची शक्यता असतानाच स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने कंपनीसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
मात्र, आंदोलन सुरू असतानादेखील डिलिव्हरी सर्व्हिसला अद्याप कोणताही फटका बसलेला नाहीये, अशी माहिती समोर येतेय.
हेही वाचा
मनसेनंतर आता काँग्रेसनेही टोलविरोधात उपस्थित केले प्रश्न
[ad_2]