Pune News Search for Escaped Leopard from Katraj Zoo Extends Beyond 24 Hours CCTV Footage Katraj Zoo

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील कात्रज भागातील ( Pune News) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) पिंजऱ्यातुन एक बिबट्या (Leopard) पळून 24 तास उलटले आहेत. मात्र अजूनही बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता कात्रज प्राणी संग्रहालयातील एक सीटीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीटीटीव्हीत बिबटा कात्रज प्राणी संग्रहालयात असल्याचं दिसत आहे. मात्र अजून हा बिबटा सापडला नाही आहे. त्याचा शोध सुरु आहे. 

अजूनही हा बिबट्या पकडलेला नाही. सुदैवाने तो प्राणी संग्रहालयाच्या आत आहे. तेथील सीसीटीव्हीमध्ये तो अधून मधून दिसतो आहे. आज सकाळी 6 ते 7 च्या सुमारास हा बिबट्या झू किचन   जवळच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला. हा बिबट्या एक ‘Captive’ प्राणी असून तो मुख्यत: प्राणी संग्रहालयातच वाढलेला आहे. त्यामुळे तो कात्रज संग्रहालयाच्या बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच बिबट्या पसार झाल्याची माहिती मिळताच प्राणी संग्रहालया बंद करण्यात आलं. त्यानंतर अनेक ठिकाणी रेस्क्यू टीम्सदेखील शोध घेत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार तो संग्रहालयातच असल्याचं दिसून आल्याने नागरिकांनी काही प्रमाणात उसासा सोडला आहे. 

कर्नाटकातील हंपीतून बिबट्या आणला होता

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.मात्र सोमवारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही. पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो पसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं त्यानंतर मागील 24 तासांपासून या बिबट्याचा शोध विविध रेस्क्यू टीम्सकडून सुरु आहे.

कात्रज परिसरात भीतीचं वातावरण 

राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज परिसरात आहे. हा बिबट्या पळाल्याने या परिसरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांकडून बिबटा कुठे गेला?, असे प्रश्न विचारले जात आहे. शिवाय  राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दीदेखील केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

इतर महत्वाची बातमी-

-Pune Weather Update : पुणेकरांना उन्हापासून दिलासा; पुण्यात 13 अंश सेल्सिअस तापमान; गारठा वाढण्याची शक्यता

-Pune News : 24 तास उलटले तरी बिबट्या सापडेना; कात्रजमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्राणीसंग्रहालय आजही बंद

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts