Mumbai records lowest march temperature since 2020 at 17.9 degrees

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मार्च महिना सुरु झाला असून थंडीचं प्रमाण कमी होऊन उन्हाळा जाणवू लागेल, अशी अपेक्षा असतानाचं मुंबईत 1 तारखेपासून 4 मार्चपर्यंत किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान सोमवारी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं होतं. गेल्या चार वर्षातील मार्च महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रृझ येथील केंद्रात सोमवारी किमान तापमान 17.9 अंश नोंदवलं गेलं. सरासरीपेक्षा ते दोन अंशांनी कमी होतं. दुसरीकडे गेल्या चार वर्षातील मार्चमधील कमी तापमान नोंदवलं गेलं. 14 मार्च 2020 ला रात्रीचं किमान तापमान 16.6 अंश नोंदवलं गेलं होतं.

1 मार्चला कमाल तापमान 37.2 अंश होतं, त 2 मार्चला त्यामध्ये सात अंशांची घसरण होऊन ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. 3 मार्चला 28.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 4 मार्चला कुलाबा येथे 28.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली तर सांताक्रुझ येथे 29.4 अंशाची नोंद झाली. कमाल तापमानात देखील मार्चच्या पहिल्या चार दिवसांमध्ये घट झाली.

मार्च महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोदं 12 वर्षांपूर्वी झाली होती. मुंबईत 10 मार्च 2012 रोजी किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाऱ्यांच्या रचनेत बदल झाल्यानं तापमानात फरक पडला आहे.

आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सध्या तापमानात झालेली घट ही उत्तरेकडील आणि पश्चिमी वाऱ्यांमुळं झाली आहे. गेल्या 48 तासात उत्तरीय आणि पश्चिमी वाऱ्यांमुळं मुंबईतील तापमानात मोठा बदल झाला आहे.

उत्तर भारतात म्हणजेच हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. देशातील काही भागात गारपीट देखील झालेली आहे. या सर्वांच्या परिणामामुळं मुंबईतील तापमानात घट नोंदवली गेली असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.


हेही वाचा


[ad_2]

Related posts