Ellyse Perry Six Broke The Glass Of Car WIPL Video Cricket News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WIPL Ellyse Perry Six Broke Car’s Window Glass :  महिला आयपीएलमध्ये 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स असा खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने यूपीचा 23 धावांनी धुव्वा उडवला. बेंगलोरच्या फलंदाजानी या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. बेंगलोरची फलंदाज अॅलेक्स पेरी हिने असा लांबलचक षटकार लगावला की, स्टेडियममधील कारच्या काचेचा चक्काचूर झालाय. आरसीबीकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या अॅलेक्स पेरीने जोरदार फटकेबाजी केली. तिने या 4 षटकार लगावले. यातील एक षटकार स्टेडियममधील कारला बसला. यामध्ये कारच्या काचेचा चक्काचूर झालेला पाहायला मिळाला. 

षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

एलिस पेरीने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एलिस पेरीने ऑन साईडला शॉट मारलेला दिसतोय. त्यानंतर हा चेंडू थेट स्टेडियमध्ये असलेल्या गाडीवर जाऊन बसलाय. त्यामुळे कारच्या काचेचा अक्षरश: चक्काचूर झालाय. काच फुटल्यानंतर चेंडू कारच्या आतमध्ये जाऊन पडला होता. कारची काच फुटल्यानंतर अॅलिस पेरीची रिअॅक्शन पाहाण्यासारखी होती. तिने डोक्याला हात लावलाय. 

19 व्या षटकात दीप्ती शर्मीच धुलाई 

आरसीबीची फलंदाज पेरीने 19 व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हा षटकार लगावला. पेरी नंबर 3 वर फलंदाजीसाठी आली आणि तिने 37 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 58 धावांची खेळी केली. तिच्या आक्रमक खेळीच्या जोरावरच आरसीबीने 198 धावांचा डोंगर उभारला. पेरीने दुसर्या विकेटसाठी स्मृती मंदानासोबत 95 धावांची भागिदारी रचली. तर ऋचा घोषसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी रचली. 

आरसीबीचा दिमाखदार विजय 

यूपी वॉरियर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने 20 षटकांत 198 केल्या. कर्णधार स्मृती मंदानाने 50 चेंडूमध्ये 10 आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 80 धावांची खेळी केली. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एलिस पेरीने 58 धावा केल्या. त्यानंतर 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतलेल्या यूपी वॉरियर्सला 175 धावाच करता आल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ishan Kishan, Dhruv Jurel : पहिली पसंती असूनही ईशान किशन अहंकराने मातीमोल अन् ध्रुव जुरेल इंग्रजांविरुद्ध लढून ‘तारा’ झाला!



[ad_2]

Related posts