baramati indapur ncp ajit pawar vs bjp harshvardhan patil letter to cm dcm lok sabha election maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागले आहे तसतशी बारामतील लोकसभेतील (Baramati Loksbha Election) महायुतीतली खदखद समोर येऊ लागली आहे. या वर वेळीच उपाययोजना केली नाहीतर महायुतीतल्या गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसणार हे निश्चित आहे. दोनच दिवसापूर्वी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महायुती संदर्भात वक्तव्य केलं आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी मित्र पक्षाकडून त्रास होत असल्याचं पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिलं. त्यामुळे भाजप-सेनेच्या या नेत्यांचा नाराजीचा फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील सोलापूर जिल्ह्यातील एका विवाह प्रसंगी एकत्र आले. त्याला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहलेले पत्र समोर आले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष थंबणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार थेट हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 

हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचा संघर्ष जुना

हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी संघर्ष जुना आहे. तिकीट मिळत नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी 19 मध्ये काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. पण हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष कायम राहिला. काही दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे वक्तव्य केले आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला. 

हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी थेट एका सभेदरम्यान एकेरी शब्दात टीका केली, तसेच शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर त्याला हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने म्हणजे अंकिता पाटील यांनी जशास तसं उत्तर देण्याचं वक्तव्य केलं.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा संघर्ष उफाळून येत आहे. त्यानंतर आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो अशी शक्यता असतानाच अजित पवारांनी इंदापुरात मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांना मित्र पक्षांशी जुळवून घ्या असे सांगितले.

अजित पवारांच्या आदेशानंतर हा संघर्ष कमी होईल असे वाटत असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी लेटर बॉम्ब टाकला आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. यावर हा महायुतीतला विषय आहे बसून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे. 

संघर्ष निवळला नाही तर राष्ट्रवादीला फटका

अजित पवारांचा आणि हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष जुना आहे. सध्या इंदापूरचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे करतात. राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा सातत्याने इंदापुरात कलगीतुरा रंगताना दिसतो आहे. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीले वितुष्ट  परवडणारे नसेल. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याची शक्यता जोर धरत असतानाच हा महायुतीतला संघर्ष निवळला नाही तर याचा फटका महायुतीला बसू शकतो. 

निवडणूक तोंडावर असताना हर्षवर्धन पाटील यांनी लेटर बॉम्ब टाकला. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या हर्षवर्धन पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध जपून आहेत. आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी जुळवून घ्यायला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना अवघड जात आहे. त्यामुळेच हा संघर्ष वाढू लागला आहे. हा संघर्ष कायम राहिला तर याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होणार हे नक्क्की.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts