Nothing Phone 2a Smartphone launched in india know price specifications features and more details marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nothing Phone 2a Smartphone :  तुम्ही जर नवीन स्मार्टफोन (Smartphone) घेण्याच्या विचारात आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Carl P च्या कंपनी Nothing ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Nothing Phone 2a आहे. हा स्मार्टफोन राजधानी दिल्लीत एका इव्हेंटमधून लॉन्च करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने जागतिक स्तरावर हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य नेमकं काय? कोणकोणते नवीन फीचर्स असतील? याचविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

स्मार्टफोनची किंमत किती?  

या स्मार्टफोनचा पहिला व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. तर, दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 25,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा तिसरा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये आहे. तुम्हाला जर फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ऑनलाईन विकत घ्यायचा असेल तर 12 मार्चपासून हा स्मार्टफोन ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याच वेळी, कंपनीने या फोनवर एक विशेष लॉन्च ऑफर देखील दिली आहे, ज्याद्वारे ग्राहक हा स्मार्टफोन 12 मार्च रोजी फक्त 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकतात.  

Nothing Phone 2a स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय?

डिस्प्ले कसा असेल? 

या स्मार्टफोनच्या मागील भागात 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशन आणि 1300 निट्स ब्राइटनेससह येतो. या स्क्रीनमध्ये 30Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

Nothing Phone 2a चा कॅमेरा कसा आहे? 

  • या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • या सेटअपचा पहिला कॅमेरा 50MP Samsung ISOCELL S5KG9 सेन्सरसह येतो. याबरोबरच OIS आणि EIS सपोर्टही दिला जातो.
  • या स्मार्टफोनचा दुसरा कॅमेरा 50MP Samsung JN1 सेन्सरसह येतो, जो 114 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह येतो.
  • फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यामध्ये 32MP Sony IMX615 सेंसर देण्यात आला आहे.

प्रोसेसर : या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 7200 Pro SoC चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali G610 GPU देण्यात आला आहे. 

सॉफ्टवेअर : Nothing Phone 2a स्मार्टफोन Android 14 NothingOS वर उत्तम काम करतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये तीन अँड्रॉईड व्हर्जन आणि चार वर्षांचे सिक्युरिटी पॅच अपडेट देण्याचं आश्वासन दिलं आहे.

बॅटरी : या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. जी 45W चार्जिंगसह सपोर्ट देते.

महत्त्वाच्या बातम्या :

Google Map : आता तुम्ही तुमचं आवडतं ठिकाण गुगल मॅपवर सेव्ह करू शकता; कसं ते जाणून घ्या

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts