Pune crime Pune News Bundle of 500 notes in drawer of municipal deputy engineer table In PMC

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका (Pune News) उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली आणि एकच खळबळ उडाली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत मात्र वेळ मारून नेली. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात आलं आणि हा सगळा प्रकार समोर आला. हा सगळा प्रकार पुणे महापालिकेतील पथ विभागात घडला. 
 

 व्हिडीओत नेमकं काय?

 पुणे महानगर पालिकेतील पथ विभागातील हा व्हिडीओ आहे. यात कार्यकर्ते थेट अभियंत्याच्या केबिनमध्ये शिरले आणि त्या अभियंत्याच्या हालचालीवरुन संशय आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अभियंत्याला काही प्रश्न विचारले मात्र अभियंता उत्तरं देत नव्हता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट अभियंत्याच्या टेबलचा ड्रावर उघडला तर 500 च्या नोटांचं बंडल सापडलं. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ठेकेदाराचे पैसे असल्याचं कार्यकर्त्यांने व्हिडीओत सांगितलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांना फोनकरुन संपूर्ण प्रकार सांगितला.

गलेलठ्ठ पगार पण…

महापालिकेतील अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार असतो. त्यात हे अभियंता सामान्य नागरिकांना एका कामासाठी दहा वेळा चकरा मारायला लावतात. शिवाय त्यांना मानसिक त्रास दिल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. एवढंच नाही तर अनेकदा लाच मागतानादेखील दिसले आहे. आतापर्यंत पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना रंंगेहात पकडल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र तरीही महापालिकेत असे प्रकार सुरु असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. 

या कार्यकर्त्यांनी रितसर महापालिकेच्या या अभियंत्याची तक्रार केली आहे. या अभियंत्यावर नेमकी कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या प्रकारावरुन कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काळे यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली मात्र अधिकारी वेळेवर पोहचले नाहीत. त्यामुळे त्यांनी लाचलुचत विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स प्रकरणात मास्टरमाईंड संदिप धुनियाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री; सोमनच्या नावाने संदिपकडे सिम कार्ड, दोघं मिळून चालवायचे ड्रग्स रॅकेट?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts