maharashtra maha vikas aghadi seat sharing news sharad pawar uddhav thackeray ready to give 6 seats to vbs prakash ambedkar marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing) अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोडं अडल्याची चर्चा आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) पाच ते सहा जागा द्याव्यात अशा मताचे आहेत. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे वंचितला तीनच जागा द्यायच्या मताचे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायच्यात यावरून महाविकास आघाडीत दोन गट असल्याचं दिसतंय.9 मार्च रोजी महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मविआची आणखी एक बैठक होऊन येत्या पाच ते सहा दिवसांनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितला किती जागा द्यायच्या यावर 14 किंवा 15 मार्चच्या सांगलीतील सभेपूर्वी अंतिम निर्णय घ्यावा असा अप्रत्यक्ष अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला आहे. 

प्रकाश आंबेडकरांसोबत थेट चर्चा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing) 

महाविकास आघाडीची वंचितसोबतची पुढची बोलणी थेट प्रकाश आंबेडकरांशीच होणार आहे. या आधी वंचितच्या वतीने पक्षाचे नेते मविआच्या बैठकीला जायचे. आतामहाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांशीच बोलणार असल्याची अट घालण्यात आली आहे. पुढची बोलणी प्रतिनिधींशी नव्हे तर थेट आंबेडकरांशी व्हावी असा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आग्रह असल्याची माहिती आहे. त्यामुळे मविआच्या जागावाटपावर अंतिम निर्णय शक्य तितक्या लवकर घेता येईल असा मतप्रवाह आहे.

महाविकास आघाडीच्या या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांसोबत आता थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात चर्चा करणार आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts