samsung galaxy a35 5g and samsung galaxy a55 5g price and features revealed marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy Smartphones : सॅमसंग (Samsung) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. येत्या 11 मार्ट रोजी भारतात सॅमसंग कंपनीकडून सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करण्यात येणार आहेत. Samsung Galaxy A35 5G आणि Samsung Galaxy A55 5G अशी या दोन स्मार्टफोनची नावं आहेत. भारतात लॉन्च होण्यापूर्वी, Galaxy A35 5G जर्मन ऑनलाईन रिटेलर साईट Otto वर सूचीबद्ध करण्यात आला आहे. यास्मार्टफोनची किंमत किती असू शकते? आणि त्याचे फीचर्स कोणकोणते असतील याबाबत एक अंदाज वर्तविण्यात आला आहे तो पाहूयात. 

आगामी स्मार्टफोनची संभाव्य किंमत किती? 

या सूचीनुसार, Samsung Galaxy A35 5G हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये आईस ब्लू, लेमन, लिलाक आणि नेव्ही ब्लू या कलरचा समावेश आहे. या स्मार्टफोनमधील प्रोसेसरसाठी Exynos 1380 SoC चिपसेट वापरला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे की या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट असू शकतात.

पहिला व्हेरिएंंट 8GB + 128GB चा असू शकतो, ज्याची किंमत 379 युरो म्हणजेच सुमारे 34,200 रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 499 युरो म्हणजेच 40,500 रुपये असू शकते. तसेच, भारतात या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

आगामी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनचे संभावित फीचर्स 

डिस्प्ले : या फोनमध्ये 6.6-इंच सॅमोलेड, फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR आणि इन्फिनिटी-ओ नॉच स्क्रीन असू शकते. 

बॅक कॅमेरा : या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP असू शकतो, जो OIS सपोर्टसह येईल. या फोनचा दुसरा कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाईड अँगल लेन्ससह आणि तिसरा कॅमेरा 5MP मॅक्रो सेन्सरसह येऊ शकतो.

फ्रंट कॅमेरा : या फोनच्या पुढील भागात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.

प्रोसेसर : या फोनमधील प्रोसेसरसाठी Samsung Exynos 1380 SoC चिपसेट दिला जाऊ शकतो, जो ग्राफिक्ससाठी Mali G68 GPU सह येईल. 

ऑपरेटिंग सिस्टम : हा फोन Android 14 वर OneUI 6 आधारित OS वर चालेल. हा फोन 4 OS अपडेटसह लॉन्च केला जाऊ शकतो.

बॅटरी : या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

Smartphone : मोबाईल स्क्रीनवर भरपूर जाहिराती दिसतायत? काळजी करू नका, ‘या’ छोट्या सेटिंगमुळे काम सोपं होईल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts