Devendra Fadnavis : पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करणार; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Devendra Fadnavis : देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील. पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

देशात पहिल्यांदा अशा प्रकारचे फायनान्सिंग

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, या भागात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन होत आहे. हे हॉस्पिटल उभारत आहे, या जे फायनान्सिंग आहे  ते माझ्या माहितीनुसार देशात पहिल्यांदा अशा प्रकारचे फायनान्सिंग करण्यात आले आहे.

मल्टिलॅटरल फायनान्सिंग आहे पण सॉवरेन ग्यारंटी

मला आठवतंय की, अंबर आयडे हे माझ्याकडे आले होते आणि त्याकाळात त्यांनी मला सांगितले होते की, आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स याचं संयुक्त फायनान्सिंग करून सुसज्ज हॉस्पिटल बनवू शकतो. त्यानंतर विक्रम कुमारांशी चर्चा झाली. पण खरे सांगायचे तर त्यावेळेस मला देखील असे वाटत होते की, मल्टीनॅशनल  फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात, नुसत्या चर्चा होतात. परंतु हे प्रकरण पुढे गेले. या हॉस्पिटलच्या बाबतीत मल्टिलॅटरल फायनान्सिंग आहे पण कुठल्याही प्रकारची सॉवरेन ग्यारंटी देण्यात आलेली नाही.

एखादी दुर्दैवी घटना घडली तर…

या प्रकल्पाची महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून या बाबतीत चर्चा केली की याची रिस्क कोन कव्हर करेल. मात्र त्यावेळी नेदरलँड्स गव्हरमेंटची एक कंपनी समोर आली. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाची 99 टक्के फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क आम्ही कव्हर करतो. म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणार आहे. पण दुर्दैवाने जर ते हॉस्पिटल होऊ शकले नाही किंवा अर्धवट राहिले तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाहीये. अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर तो नेदरलँड्सची एजन्सी ही बँकरला परत करेल. अशा प्रकारचे ‘वीन वीन’ फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेले नाही.

केवळ सव्वा टक्क्यांच्या रेट ऑफ इंटरेस्टने मिळाले कर्ज

तसेच मला सांगताना आनंद वाटतो की या प्रकल्पाला केवळ सव्वा टक्क्यांचा रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज मिळालेले आहे. हे पहिले मॉडेल आहे, हे यशस्वी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची मॉडेल्स तयार करता येतील. यात सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परवडणारी आरोग्य सेवा जनतेला पुरवला येईल. अत्यंत चांगल्या प्रकारचे हे मॉडेल तयार झालेले आहे. पहिलं मॉडेल वार्जेला तयार होतंय, म्हणून सगळ्यांचे अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा

मोठी बातमी: शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंचीही घोषणा, मुंबईतील उमेदवार जाहीर!

[ad_2]

Related posts