apple macbook air m3 goes sale on today check price features and specifications marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Apple MacBook Air M3 : Apple च्या वेगवेगळ्या गॅजेट्सपैकी एक म्हणजेच Apple MacBook. या Apple च्या MacBook Air M3 ची भारतात नुकतीच विक्री सुरू झाली आहे. यावेळी ॲपलने 13 इंच आणि 15 इंच मॅकबुकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स समाविष्ट केले आहेत. यामध्ये ॲपलची नवीन M3 चिप देण्यात आली आहे. ही चिप कामगिरीच्या बाबतीत आधीच्या चिपपेक्षा जास्त फास्ट आहे. यामध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि दीर्घ बॅटरी लाईफ आहे. नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या या MacBook Air M3 चं वैशिष्ट्य नेमकं काय ते जाणून घेऊयात. 

Apple MacBook Air M3 13 इंचाची किंमत किती?

MacBook Air 13 M3 तीन कॉन्फिगरेशनमध्ये येते.

ऍपलची M3 चिप MacBook Air 13 मध्ये देण्यात आला आहे. जे यूजर्सना कामगिरीच्या बाबतीत चांगला अनुभव देते. M3 चिपमध्ये 8 कोर CPU, 8 कोर GPU, 8GB युनिफाईड मेमरी आणि 256GB SSD स्टोरेज आहे. त्याची किंमत 1,14,900 रुपये आहे. तर, 512GB MacBook मध्ये आढळलेली M3 चिप 8 core CPU, 10 core GPU, 8GB युनिफाईड मेमरी आणि 512GB SSD स्टोरेजसह प्रदान करण्यात आली आहे. त्याची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरू होते. यात आणखी एक व्हेरिएंट आहे. ज्यामध्ये 8 कोर CPU, 10 core GPU, 16GB युनिफाईड मेमरी आणि 512GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. त्याची किंमत 1,54,900 रुपयांपासून सुरू होते.

MacBook Air M3 15 इंचाची किंमत किती? 

MacBook Air M3 15 इंच देखील तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो.

  • Air 13 M3 च्या 15-इंच मॉडेलमध्ये 8 कोर CPU, 10 core GPU, 8GB युनिफाइड मेमरी आणि 256GB SSD स्टोरेज आहे. त्याची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरू होते.
  • दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये 512GB SSD स्टोरेज उपलब्ध आहे. त्याची किंमत 1,54,900 रुपयांपासून सुरू होते.
  • 16GB युनिफाइड मेमरी आणि 512GB SSD स्टोरेज असलेल्या मॉडेलमध्ये 8 कोर CPU, 10 कोर GPU देखील आहे. त्याची किंमत 1,74,900 रुपयांपासून सुरू होते.

डिस्काऊंट आणि उपलब्धता

13-इंच आणि 15-इंच मॅकबुक एअर M3 Apple.com, ऍपल स्टोअर्स (साकेत आणि BKC) आणि थर्ड पार्टी रिटेल स्टोअर्समधून मिळू शकते. ॲपल त्यांच्या खरेदीवर 8000 रुपयांची सूट देत आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास सवलत देखील उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स 

  • ऍपलचे नवीन मॅकबुक एअर मॉडेल्स स्लिम आणि हलक्या डिझाईनसह सादर करण्यात आले आहेत. हे मिडनाईट, स्टारलाईट, स्पेस ग्रे आणि सिल्व्हर कलरमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.  
  • दोन्ही आकारांचे मॅकबुक 500 निट्स ब्राइटनेस आणि लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतात.
  • कंपनीने दावा केला आहे की, M3 चिप M1 पेक्षा 60 टक्के जास्त वेगवान आहे. 
  • ते एका चार्जवर 18 तास वापरले जाऊ शकतात. यामध्ये Wi-Fi 6E सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Infinix Smart 8 HD 9 हजारांचा फोन आता फक्त 1300 रुपयांत; पैसे वाचवण्यासाठी काय करावं लागेल?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts