ajit pawar statement On narendra modi on the occasion of innogration of multispeciality hospitalWarje pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोंदींना (Pm Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ही गाठ मनाशी बाळगा आणि पुढील काही वर्षात अजून विकासाला चालना मिळेल, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  (Ajit Pawar) केलं आहे. पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं (PMC multispeciality hospital pune) भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे. याच कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

अजित पवार म्हणाले की, मी अनेक नगरसेवकांना या परिसरात निवडून आणलं आहे. त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांनीदेखील या परिसरात अनेक नगरसेवक निवडून आणले आहेत. म्हणजेच दोन्ही दादांनीच या मतदार संघात लोक निवडून आणले आहेत बाकी कोणीच आलं नव्हतं, असंही त्यांनी थेट सांगितलं आहे. 

निवडणुका सुप्रिम कोर्टामुळे रखडल्या!

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका सुप्रिम कोर्टामुळे रखडल्या आहेत. या निवडणुका लवकर व्हाव्यात, असं आम्हालाही वाटतं. आम्हालादेखील लोकांनी निवडून दिलं आहे.  प्रत्येक कार्यकर्त्यांला संधी मिळावी, अशी आमची इच्छा असते. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर पंचायत, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. या सगळ्यात सुप्रिम कोर्टात ओबीसीचा मुद्दा गेला आहे. लवकरच याचा निकाल लागेल. या सगळ्या प्रक्रियेकडे राज्यसरकारचं लक्ष आहे. लवकरात लवकर या सगळ्या निवडणुका व्हाव्यात, अशा विचारांचं महायुतीचं सरकार आहे, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

16 टक्के बेड मोफत

मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयावर बोलताना ते म्हणाले की, या मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयात सगळ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यात 16 टक्के बेड सगळ्या रुग्णांसाठी मोफत करण्यात आले आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचा गरजूंना फायदा होणार आहे. साधारण या रुग्णालयाचा विचार सुरु झाला तेव्हापासून या रुग्णालयाचा गरजूंना कसा फायदा होईल, याचा विचार करण्यात आला आहे. कोरोनात आपाल्याला रुग्णालयाचं महत्व समजलं असल्याचं ते म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts