Dilip Mohite : ‘आमची भेट झाली याचा अर्थ मनोमिलन झाले असे नव्हे’, आढळरावांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा नाराजीचा सूर कायम, अजितदादांना इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shirur Lok Sabha Constituency : येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) जाहीर होतील. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहे. निवडणुकांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao) इच्छुक असल्याची जोरदार चर्चा असताना आज त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची आढळरावांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आपापसातील वैर संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आढळरावांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा (Dilip Mohite) नाराजीचा सूर अद्याप कायम आहे.  

शिंदे गटाचे शिवाजी आढळराव मला भेटले म्हणजे आमचे मनोमिलन झाले, असे अर्थ काढू नका, असं म्हणत अजित पवार गटातील खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहितेंनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशाला विरोध कायम ठेवला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) जे केलं तेच अजित पवार (Ajit Pawar) करू पाहत असतील. तर राजकारण सोडून दिलेलं बरं राहील, असं म्हणून मोहितेंनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांवर ही निशाणा साधला. 

शरद पवारांनी जे केलं आता तेच अजित पवार करू पाहतायेत का?

आजवर शरद पवारांनी जे केलं आता तेच अजित पवार करू पाहतायेत का? हे सगळं ठरवून सुरू आहे का? आम्हाला विश्वासात न घेता का केलं जातंय? आम्हाला राजकारणातील काही कळत नाही, असं अजित पवारांना वाटतंय का? असं म्हणत मोहितेंनी अजित पवारांना लक्ष केलं. 

…तर मी शांत बसणं पसंत करेन

याऊलट तर मी शांत बसणं पसंत करेन. कारण आता मला कोणतं पद मिळेल असं वाटत नाही, जे मिळालं ते पुरेसं आहे. त्यामुळं आढळरावांचा प्रचार करायची वेळ आली तर राजकारण सोडून देईन, असंच दिलीप मोहितेंनी यातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला.

आढळराव-मोहितेंच्या भेटीतून मनोमिलन नाहीच

दरम्यान, शिवाजी आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची शनिवारी घरी जाऊन भेट घेतली आणि भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मोहितेंसोबतचे वैर मी घरी जाऊन संपवले, असं दाखवून आढळराव राष्ट्रवादी काँगेसमधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत होते. पण या भेटीतून आढळरावांच्या हाती काही लागलंय असं दिसत नाही. कारण दिलीप मोहितेंनी शनिवारच्या भेटीतून आमचं मनोमिलन झालं नसल्याचं स्पष्ट केलंय. 

आणखी वाचा 

Ramdas Kadam: भास्कर जाधवांना शिंदे गटात का घेतलं नाही? या एका कारणामुळे सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन माघारी फिरावं लागलं; रामदास कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts