how buy FasTag online from whatsapp follow these simple and easy steps marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fas Tag : पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयच्या बंदीनंतर फास्टॅग (FASTag) मिळणे ही एक मोठी समस्या बनली आहे. पण, तुम्ही आता व्हॉट्सअपच्या (Whatsapp) मदतीने देखील फास्टॅग ऑनलाईन खरेदी करू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याचा फास्टॅग तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल, जो तुम्ही तुमच्या वाहनात बसवून कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करू शकाल. चला तर जाणून घेऊयात ही प्रक्रिया नेमकी कशी आहे. 

FASTag म्हणजे काय?

FASTag हे एक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या प्रीपेड अकाऊंटशी जोडलेले ठेवते. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर सेट केले जाते. ज्याद्वारे टोलवर ऑनलाईन पैशांचे व्यवहार केले जाऊ शकतात. त्यातून आपोआप टोलचे पैसे वजा केले जातात. यामुळे तुमचा टोलनाक्यांवर वेळ वाया जात नाही. FASTag 5 वर्षांसाठी वैध राहतो. फास्टॅग खरेदी केल्यानंतर ते वेळोवेळी रिचार्ज करावे लागते.

WhatsApp वरून फास्टॅग कसा मिळवायचा?

जर तुम्हाला व्हॉट्सअपवरून फास्टॅग मिळवायचा असेल तर यासाठी फार सोपी प्रक्रिया आहे ती फॉलो करून तुम्ही तुमचा फास्टॅग मिळवू शकता. 

तुम्ही ICICI बँकेच्या नाविन्यपूर्ण WhatsApp बँकिंगद्वारे फास्टॅगसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला ‘8640086400’ हा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागेल.

यानंतर तुम्हाला 8640086400 या व्हॉट्सॲप नंबरवर ‘Hii’ असा मेसेज पाठवावा लागेल.

यानंतर तुम्हाला अनेक तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर अनेक ऑप्शन्स ओपन झालेले दिसतील.  

यामध्ये ICICI फास्टॅग सेवांसाठी ‘3’ टाईप करा. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. 

नवीन टॅगसाठी जर तुम्हाला तुमची रिक्वेस्ट वाढवायची असेल तर यासाठी पुन्हा तुम्ही ‘3’ टाईप करा.

यानंतर तुम्हाला ICICI बँकेच्या FASTag ऍप्लिकेशन पेजची लिंक मिळेल.

आता जो ऑप्शन तुमच्या स्क्रिनवर तुम्हाला दिसतोय त्यामध्ये तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतील.

एकदा तुम्ही पेमेंटची प्रोसेस पार केली की तुम्हाला FASTag तुमच्या पत्त्यावर येईल.

अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप अकााऊंटवरून फास्टॅग मिळवू शकता. यासाठी फक्त योग्य स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

पॉवर बँक सारखी बॅटरी, 200MP कॅमेरा आणि 1800 तासांचा बॅकअप; Unihertz Tank 3 स्मार्टफोन लॉन्च

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts