Mumbai Indians May Loose Rohit Sharma In Ipl 2024 Due To Stiff Back Hardik Pandya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma, IPL 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं नुकताच इंग्लंडचा (IND vs ENG) धुव्वा उडवला. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला. आता भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळताना दिसतील. पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा झटका बसण्यची शक्यता आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता नाही. हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) नेतृत्वात रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं समोर आलेय. रोहित शर्मा दुखापतीमुळे (Rohit Sharma Injury Update BCCI) आयपीएलमधून माघार घेऊ शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ टी 20 विश्वचषकात खेळणार आहे. त्याआधी फिटनेसवर काम करण्यासाठी रोहित शर्मा आयपीएलमधून ब्रेक घेऊ शकतो, असं काही रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आलेय. 

Rohit Sharma Injury Update BCCI अखेरच्या कसोटीत रोहित दुखापतग्रस्त – 

धर्मशाल येथे झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत भारताने सहज विजय मिळवला. पण तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा फिल्डिंगसाठी मैदानात आला नव्हता. रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यानं मैदानावर न उतरण्याचा निर्णय घेतल होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं संघाची धुरा संभाळली होती. बीसीसीआयनं रोहित शर्मा पाठदुखीमुळे मैदानात उतरला नसल्याचं अपडेट दिलं होतं. त्यावरुनच रोहित शर्मा आयपीएलमधून माघार घेणार असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात रोहित खेळणार का ?

रोहित शर्माला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर रोहित शर्माला पाठदुखीचा जास्त त्रास होत असेल तर आयपीएल 2024 मधून तो माघार घेऊ शकतो. रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहित शर्मा आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चाहत्यांच्या नजरा रोहित शर्माच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. 

कर्णधारपदावरुन रोहित शर्माची हाकालपट्टी केली

आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्स संघानं मोठा निर्णय घेतला. मुंबईने रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकालपट्टी केली. मुंबईने गुजरातकडून आयात केलेल्या हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवली. मुंबईने आयपीएल लिलावाआधी हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये ट्रेड केले होते. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून जाहीर केले.  

[ad_2]

Related posts