BJP leader kirit Somaiya reaction on Thackeray camp Ravindra Waikar join Shivsena Shinde camp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या सोहळ्यात शिंदे गटात प्रवेश केला. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर होते. मात्र, आता त्यांनी सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या पाठिशी लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याविरोधात सर्वप्रथम भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उकरुन काढले होते, ते पुढे लावूनही धरले आणि त्यामुळे रवींद्र वायकर चौकशीच्या जाळ्यात गुरफटत केले. परंतु, आता शिंदे गटात प्रवेश केल्याने रवींद्र वायकर यांना ईडीच्या कचाट्यातून मुक्तता मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी किरीट सोमय्या यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रवींद्र वायकर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिंदे गटातील प्रवेश याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा किरीट सोमय्या यांनी म्हटले की, मी रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माझे काम पार पाडले. आता पुढील जबाबदारी ही तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेची असल्याचे सांगत याप्रकरणातून अलगदपणे आपले हात काढून घेतले. 

मला उद्धव ठाकरे यांची सध्या जी अवस्था झाली आहे, ती बघून वाईट वाटते. उद्धव ठाकरे यांच्या फायनान्स पार्टनरने त्यांची साथ सोडली. गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचा जो दहशतवाद सुरु होता, तो आम्ही संपवला आहे. आम्ही राज्यात कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही. माझे काम असेच सुरु राहील. विविध पक्षांमधील दोन डझन नेते ज्यांच्यावर मी आरोप केले त्या सर्वांची चौकशी सुरु आहे. हा तपास पुढे कसा न्यायचा ही संबंधित तपासयंत्रणांची जबाबदारी आहे. रवींद्र वायकर असो किंवा आणखी कुणी असो, मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची दहशत मी संपवली. माझी लढाई अशीच सुरु राहील. राज्यात मोदी गॅरंटीचे पालन होईल. यापुढे कुणीही भ्रष्टाचार केला तर त्याला माफ करणार नाही. भ्रष्टाचाराची जी प्रकरणे न्यायालयात आहेत त्यांचे काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे, अशी पुस्तीही यावेळी किरीट सोमय्या यांनी जोडली.

रोहित पवारांनी कर्जाचे पैसे इतरत्र फिरवल्यामुळे कारखान्यावर जप्तीची कारवाई: किरीट सोमय्या

मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कोणतेही पद नाही. मी आरोप केलेली सर्व प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. आता शरद पवार हे रोहित पवारांची एवढी बाजू घेत आहेत. पण कर्ज कोणी मिळवले आणि कर्ज कुठे फिरवले, हेदेखील पवार साहेबांनी सांगावे. याच कारणामुळे रोहित पवार यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. 

रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश का केला?

रवींद्र वायकर यांनी वर्षा बंगल्यावरील सोहळ्यात शिंदे गटात प्रवेश करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघातील आरे कॉलनीमधील रस्त्याच्या कामासाठी 178 कोटींच्या निधीची गरज आहे. तेथील नागरिक दररोज मरणयातना सहन करत आहेत मात्र आजवर त्यांना न्याय मिळालेला नाही.  तसेच गोरेगाव मधील रॉयल पाम मधील पाण्याचा प्रश्न असेल तसेच विभागातील इतर विकासकामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. निधी मिळाल्याशिवाय स्थानिक मतदारांना न्याय देता येत नाही त्यामुळे सत्ताधारी पक्षात गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न सोडवणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा

जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts