Chandra Grahan 2024 : होळीला असणार चंद्रग्रहण ‘या’ राशींना करणार श्रीमंत, प्रत्येक कामात मिळणार यश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandra Grahan 2024 : चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व असून ते अशुभ मानले जाते. खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य झालेला आपण पाहतो. पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वीसह मानवी जीवनावरही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. (Chandra Grahan 2024 on Holi will make these zodiac signs rich success in every work)

या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असणार आहे. 2024 चं पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला असणार आहे. हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण असून वर्षातील पहिलं चंद्रग्रहण काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फलदायी ठरणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ सिद्ध होणार आहे. तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या कामाचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला मोठे पदही मिळणार आहे. या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची संधी मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळणार असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

या राशीसाठी चंद्रग्रहण शुभ असणार आहे. चंद्रग्रहणाचा शुभ प्रभावामुळे तुमचं नशीब उजळणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. नोकरीत महत्त्वाचं पद तुम्हाला मिळणार आहे. काही महत्त्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात. तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. व्यापारी वर्गाशी संबंधित या राशीच्या लोकांना नफा कमावण्याची संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. चंद्र देवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती लाभणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण खूप जास्त चांगल सिद्ध होणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे. तुम्हाला मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळणार आहेत. व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा मिळणार आहे. या राशीचे लोक त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होणार आहेत. पगारात चांगली वाढ होणार आहे. मित्र आणि पालकांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts