Airtel Prepaid Plan Price Hike Airtel Tarriff Plan New Rates from 11 march jio and vi future plan marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Airtel Prepaid Plan New Rates : एअरटेलच्या (Airtel) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एअरटेल युजर्सला मोठा झटका बसला आहे. एअरटेल कंपनीचं सिमकार्ड वापरत असाल तर, तुमच्या खिशावरील भार वाढणार आहे. भारती एअरटेल कंपनीने दोन प्रीपेड प्लॅनमध्ये वाढ केली आहे, यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे. दरम्यान, भारती एअरटेल टेलिकॉम कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी काही दिवसांपूर्वीच टॅरिफ प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ होण्याचे संकेत दिले होते. 

एअरटेल युजर्सला मोठा झटका

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या एअरटेल कंपनीने दोन प्रीपेड टॅरिफ प्लॅनच्या किमतीमध्ये बदल केला असून त्याचे दर वाढवले आहेत. भारती एअरटेल कंपनीन 118 रुपये आणि 289 रुपयांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एअरटेलचा 118 रुपयांचा प्लॅन आता 129 रुपयांना मिळेल. याशिवाय 289 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 329 रुपये करण्यात आली आहे. या दोन्ही प्लॅनच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. 

118 रुपयांचा प्लॅन आता 129 रुपयांना

एअरटेलचा 118 रुपयांचा प्लॅन आता 129 रुपयांना मिळेल. या प्लॅनमध्ये 12GB डेटा मिळेल. वापरकर्ते त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या वैधतेदरम्यान कधीही हा डेटा वापरू शकतात. या 12 GB डेटाची वैधता युजर्सच्या अॅक्टिव्ह प्रीपेड प्लॅनसारखीच असेल. एअरटेल युजर्सना या प्लॅनसह इतर कोणताही लाभ मिळणार नाही. दरम्यान, या प्रीपेड टॅरिफ प्लॅनची ​​किंमत आधी 118 रुपये होती, त्यानुसार इंटरनेट डेटाची किंमत 9.83 रुपये प्रति जीबी होती, पण आता या प्लॅनची किंमत वाढल्यानंतर, डेटाची किंमत 10.75 रुपये प्रति जीबी असेल.

एअरटेलचा 329 रुपयांचा प्लॅन

यापूर्वी या प्रीपेड टॅरिफ प्लानची किंमत 289 रुपये होती. या प्लॅनमध्ये यूजर्सना 35 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 4GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळते. याशिवाय, या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Airtel Thanks App ची सुविधा मिळते. यासह, एअरटेल युजर्सना Apollo 24|7 मंडळ सदस्यता, मोफत HelloTunes आणि Wynk Music मिळते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts