Mercury Rahu conjunction in Pisces People of this zodiac may suffer loss

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh-Rahu Yuti: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक ग्रहांची युती होते. ही युती काही वेळा शुभ असते किंवा अशुभ असते. 7 मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश केला आहे. याठिकाणी राहू आधीच उपस्थित असल्याने या दोन्ही ग्रहांची युती झाली आहे. 

या दोन ग्रहांच्या युतीमुळे 3 राशींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 18 वर्षांनंतर बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर याचा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांवर बुध आणि राहूचा संयोग जास्त दिसून येणार आहे. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. राहूच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

सिंह रास

7 मार्च रोजी होणाऱ्या बुधाच्या राशी परिवर्तनाचा देखील सिंह राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. तणाव वाढल्याने आरोग्यही चांगले राहणार नाही. तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मार्च महिन्यात आर्थिक बाबतीत बेफिकीर राहणे टाळावे लागेल. 

कन्या रास

या राशीच्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागेल. बुध आणि राहूच्या संयोगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अडचणींचा असणार आहे. बुध आणि राहूच्या संयोगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts