vasant more profile resignation from mns letter to raj thackeray possibly to join ncp sharad pawar maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंच्या मनसेला (MNS Raj Thackeray) मोठा धक्का बसला असून फायरब्रँड नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी राजीनामा दिला आहे. पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी आधी एका फेसबुक पोस्टच्या (Vasant More Facebook Post) माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामागे त्यांनी घेतलेली शरद पवारांची (Sharad Pawar) दोन मिनिटांची ती भेट निर्णायक ठरली का असा प्रश्न विचारला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का याचीही उत्सुकता पुणेकरांना आहे.

मनसेमध्ये कुचंबना, राज ठाकरेंनाही सांगितलं होतं 

वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. तीन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या कामाचा जसा धडाका तसाच त्यांचा स्वभावही बेधडक. त्यामुळेच कुणालाही कधीही अडचण असो, वसंत मोरे त्या ठिकाणी पोहोचणारच अशी त्यांची ख्याती. पण गेल्या काही काळापासून त्यांची मनसेमध्ये कुचंबना होत असल्याचं दिसून येत होतं.

मनसेमध्ये होणारी कुचंबना त्यांनी राज ठाकरेंच्या कानावरही घातली होती. वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची समजूतही काढली होती आणि त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय केलं. 

लोकसभेसाठी इच्छुक, पण पक्षाकडून प्रतिसाद नाही (Pune Lok Sabha Election) 

पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण पक्षाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. उलट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना लोकसभेची तयारी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आधीच नाराज असलेले वसंत मोरे अधिकच नाराज झाले होते. वसंत मोरे यांनी त्यावेळीही एका पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे टीका केली होती. 

आताही पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मंगळवारी मध्यरात्री एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की,  एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. 

शरद पवारांची ती दोन मिनिटांची भेट

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला अचानक वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसोबत दोन मिनिटे चर्चा करून ते निघून गेले. ही भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी जरी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का? वसंत मोरे हे शरद पवरांसोबत जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts