Yashsavi Jaiswal won icc player of the month award kane williamson and pathum nissanka team India vs England

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yashsavi Jaiswal: इग्लंडविरुद्ध (IND vs ENG) नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत आपल्या धमाकेदार खेळीनं सर्वांना घाम फोडणाऱ्या यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) आयसीसीनं (ICC) मोठा पुरस्कार दिला आहे. फेब्रुवारी मधील ICC प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of The Month Award) अवॉर्डनं यशस्वीला गौरवण्यात आलं आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि पाथुम निसांका (Pathum Nissanka) या दोन्ही धुरंधरांना मागे टाकत यशस्वीनं ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’चा अवॉर्ड आपल्या नावे केला आहे.

यशस्वीनं साहेबांच्या संघाचा पुरता धुव्वा उडवला होता. त्यानं इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 712 धावा केल्या. त्यानं या कसोटी मालिकेत दोन द्विशतकही झळकावलं. तसेच, यशस्वीनं या काळात अनेकांचे रेकॉर्डह मोडीत काढले. एका कसोटी मालिकेत 700 प्लस धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीपूर्वी हा रेकॉर्ड केवळ सुनील गावस्कर यांच्या नावावर होता.  

ICC प्लेयर ऑफ द मंथ गोज टू यशस्वी जायस्वाल

यशस्वी जायस्वालनं फेब्रुवारी 2024 चा  ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथचा अवॉर्ड जिंकला. त्यानं न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका यांना मागे सोडलं, ज्यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. जायस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं फेब्रुवारी महिन्यात सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शानदार द्विशतकं झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली.

फेब्रुवारीत यशस्वीची बॅट तळपली          

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीनं धुवांधार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. जायस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये धमाकेदार खेळी केली. त्यानं वायझॅगमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 219 धावा केल्या आणि त्यानंतर राजकोट येथील पुढील कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. जायस्वालच्या या खेळीमुळे टीम इंडियाला मालिकेतील पहिल्या कसोटीतील पराभवातून सावरता आलं. टीम इंडियाच्या या युवा सलामीवीर फलंदाजाने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम केले आणि राजकोटमधील खेळीदरम्यान एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार (12) मारण्याच्या दीर्घकालीन कसोटी विक्रमाची बरोबरी केली.                     

महत्त्वाच्या इतर बातम्या :   

T20 World Cup 2024: धीम्या खेळपट्टीच्या नावावर किंग कोहलीचा खेळ खल्लास? टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान न मिळण्याची शक्यता

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts