Rajmal Lakhichand Jewellers News Fully Cooperated In ED Investigation Says Manish Jain In Jalgaon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manish Jain : ईडी चौकशीसंदर्भात (ED investigation) मी सर्व सहकार्य केल्याचे मत जळगावच्या (Jalgaon) आर एल ग्रुपचे संचालक मनीष जैन यांनी व्यक्त केले. मात्र, एसबीआय (SBI) कडून कर्ज घेताना गॅरंटी म्हणून दाखवलेलं सोनं प्रत्यक्षात नव्हतेच, ते फक्त कागदोपत्री होते. या मुख्य आरोपाबद्दल बोलण्यास मनीष जैन (Manish Jain) यांनी नकार दिला आहे. 

नागपुरातील ईडी कार्यालयात चौकशी

जळगावच्या आर एल ग्रुप चे संचालक मनीष जैन आणि त्यांची पत्नी नीतिका  जैन यांची दोन दिवस चाललेली Ed चौकशी बुधवारी संध्याकाळी संपली. सलग दोन दिवस ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील ईडी कार्यालयात मनीष जैन आणि नीतिका जैन यांची अनेक तास चौकशी केली. जळगावमध्ये अनेक तास चौकशी झाल्यानंतर पुन्हा नागपूरात अनेक तास आमची चौकशी करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले. जे काही नवीन डॉक्युमेंट्स ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे मागितले होते, ते सर्व आम्ही त्यांना आणून दिल्याची प्रतिक्रिया मनीष जैन यांनी दिली आहे.

आम्हाला न्यायाची अपेक्षा

आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य केले असून आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मनीष जौन यांनी दिली. चौकशीच्या दोन्ही दिवशी जैन धर्माचा पर्युषण पर्व सुरू होता. त्यामुळं ईडीची कार्यवाही सुरु असतानाही आमच्या सर्व धार्मिक प्रार्थना सुरू होत्या असेही मनीष जैन म्हणाले. दरम्यान आर एल ग्रुपचे प्रमुख ईश्वरलाल जैन यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते चौकशीसाठी आले नाही. त्यांची चौकशी पुढे कधी तरी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली असून, ईडीने ती मान्य केल्याची माहितीही मनीष जैन यांनी दिली.  

मुख्य आरोपाबद्दल बोलण्यास मनीष जैन यांचा नकार

दरम्यान, एसबीआयच्या कर्ज प्रकरणासंदर्भात आर एल ग्रुपवर जो सर्वात प्रमुख आरोप होत आहे तो म्हणजे शेकडो कोटींचे कर्ज घेताना त्याची गॅरंटी म्हणून दाखवण्यात आलेलं सोनं प्रत्यक्षात आर एल ग्रुपकडे कुठेच नव्हते. ते फक्त कागदोपत्रीच होते. या प्रमुख आरोपासंदर्भात मनीष जैन यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील राजमल लखीचंद (Rajaml Lakhichand Jewellers) अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यासाठी मुंबई, नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Jalgaon : जळगावमधील आर एल ज्वेलर्सवर ईडीकडून छापेमारी; तब्बल साठ अधिकारी तळ ठोकून, आतापर्यंत काय सापडलं? 

 

 

[ad_2]

Related posts