IPL 2024 Rohit Sharma will play under Hardik Pandya mumbai indians marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024, Mumbai Indians : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएल 2024 आधीच मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतला होता. दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला. रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी करुन मुंबईने हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवली. मुंबई इंडियन्सच्या या निर्णायाचा सर्वांनाच धक्का बसला. रोहित शर्माच्या चाहत्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यासारख्या अनुभवी खेळाडूंनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्सनं कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे आयपीएलमध्ये आता वेगळाच इतिहास पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात याआधी असे कधीच झालं नव्हतं. 

आयपीएल 2024 आधी  कर्णधार म्हणून मुंबईने रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्याची निवड केली. मगील 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यंदाच टीम इंडियाचा कर्णधार आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्याचा फटका मुंबईला बसलाय. सोशल मीडियावरुन त्यांचे फॉलोअर्स कमी झाले. त्याशिवाय चाहत्यांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येतेय. 

आयपीएल 2024 आधी मिनी लिलाव पार पडला होता. त्याआधीच मुंबईने ट्रेड विंडोद्वारे हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने दोन वर्षांत शानदार कामगिरी केली होती. गुजरातने 2022 आणि 2023 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातला जेतेपदही मिळालं होतं. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्याची आयात केली. पांड्याला घेतलं तोपर्यंत काहीच नव्हतं, पण त्याला कर्णधार केल्यानंतर चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. मुंबईचे चाहते आक्रमक झाले होते. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

धोनी, विराट टीम इंडियाचे कर्णधार असताना….

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला पाचवेळा विजेतेपद जिंकून दिलं आहे. रोहित खेळत असतानाही त्याचा आता फक्त खेळाडू म्हणून संघात समावेश असणार आहे. आयपीएल 2008 च्या पहिल्या पर्वामध्ये एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून तो सीएसके संघाचं कर्णधारपद पाहत होता.  2017 साली टीम इंडियाचा  कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. धोनीनंतर विराट कोहली टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तोसुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळला आहे. मात्र आता रोहित पूर्णवेळ कर्णधार असताना खेळाडू म्हणून खेळणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार असताना आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts