Raj Thackeray Son Amit Thackeray ask Vasant More not to share post on social media causes resign from MNS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: मनसेचे पुण्यातील माजी नेते वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात या गोष्टीचा जोरदार चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी पक्ष सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणे मनसेच्या कार्यकारिणीतील नेत्यांना लक्ष्य केले होते. या नेत्यांनी सातत्याने गटबाजी करुन आपल्याला डावलले. या सगळ्याला कंटाळूनच आपण मनसेतून कधीही न परतण्यासाठी राजीनामा देत आहोत, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले होते. परंतु, वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यासाठी दिलेले कारण म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी महिन्यात घडलेली एक घटना वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्यादृष्टीने ट्रिगर पॉईंट ठरली, असे सांगितले जाते. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापले होते. गेल्या 25 वर्षांमध्ये आपल्याला कधी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी झापले नाही, पण अमित ठाकरे (Amit Thackeray) आपल्याला ओरडले, ही गोष्ट वसंत मोरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळेच वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्का केल्याचे सांगितले जाते.

नेमकं काय घडलं होतं?

वसंत मोरे यांनी अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एरवीही वसंत मोरे हे सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. परंतु, वसंत मोरे यांनी 27 फेब्रुवारी रोजी लिहलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मनसेच्या पुण्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. हीच गोष्ट अमित ठाकरे यांना खटकली होती. यावरुन त्यांनी वसंत मोरे यांना, ‘सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा’, असा सल्ला दिला होता. त्यामुळे वसंत मोरे दुखावल्याचे सांगितले जाते.

वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणले आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजलं तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटला कसे नाही… मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा… साहेब मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालतो होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल… अमितसाहेब तुमच्यासाठी काहीपण फक्त मला समजून घ्या’, असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. 

आणखी वाचा

वसंत मोरेंना मुरलीधर मोहोळांचा फोन; वसंत मोरे भाजपात जाणार?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts