Pune Vasant More we did not call to vasant more letter Publishe from MNS maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


पुणे :
वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध (Vasant More) पक्षातून फोन आले. त्यासोबत कॉंग्रेस आणि अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंची भेट घेतली. त्यासोबत राज ठाकरेंचादेखील  (Raj Thackeray)माझ्यासाठी एका पदाधिकाऱ्यांला फोन आला. मात्र मी बोललो नाही कारण मला त्यांच्याशी खोटं बोलता येणार नाही, असं वसंत मोरे म्हणाले. मात्र यानंतर ‘आम्ही वसंत मोरेंसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आला नाही’, असं मनसेकडून अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी  माझी नाराजी राज ठाकरेंवर नाही आहे, असं स्पष्ट केलं होतं. मात्र राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एका पदाधिकाऱ्याच्या फोनवरुन राज ठाकरेंनी फोन केला होता. मात्र मी त्यांच्याशी काहीही बोललो नाही. मला मी राज ठाकरेंना कधी फसवलं नाही आणि त्यांना कधी फसवणार देखील नाही. त्यामुळे मी राज ठाकरेंसोबत बोलत नाही आहे. मी माघारी मनसेत जाणार नाही आहे. त्यामुळे मला राज ठाकरेंसोबत बोलणं जड जात असल्याचं ते म्हणाले होते. मात्र त्यावर मनसेने थेट पत्र काढत वसंत मोरेंचं वक्तव्य खोडून काढलं आहे. मनसेने संपर्क केला नसल्याचं पत्रात लिहिण्यात आलं आहे. 

मनसेत होत असलेल्या अपमानावरुन मी राजीनामा दिला आहे, असं म्हणत वसंत मोरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर या सगळ्यासंदर्भातली माहिती मी राज ठाकरेंच्या कानावर घातली होती. अमित ठाकरेंनादेखील याची कल्पना होती. त्यानंतर  मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. पण साहेब मला काही बोलले नाही, असं ते म्हणाले होते. पक्षात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर तिथं राहून काही फायदा नाही. राजसाहेबांशी माझा वाद नव्हता, पक्षासोबतही वाद नव्हता, पण काही पदाधिकाऱ्यांमुळे वाद होता. त्यांनी पक्षाचं वाटोळं केलं आहे’, असं त्यांनी खड्या शब्दांत सांगितलं होतं. 

वसंत मोरेंनी अमित ठाकरेंमुळे राजीनामा दिला का?

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी पुण्यात विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी मोर्चा आयोजित केला होता. त्यानंतर वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्यावेळी फोन करुन अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापलं होतं. सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अशी तंबी दिली होती. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मागील 25 वर्षात राज ठाकरे काहीही बोलले नाहीत मात्र अमित ठाकरे लगेत बोलले, असं ते म्हणाले. त्यामुळे वसंत मोरेंनी अमित ठाकरेंमुळे राजीनामा दिला का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts