BJP Vidarbha Candidate List Sanjay Rathod from Yavatmal Washim NCP  Dharmababa Atram on Kamal symbol Maharashtra Politics marathi update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आजी खासदारांचा पत्ता कट करून नवीन चेहरे देण्याचं भाजपचं धक्कातंत्र राज्यातही सुरू आहे. आता विदर्भातही तीच चाल भाजप खेळण्याची शक्यता आहे. विदर्भात चार जागांवर नवीन चेहरे देण्याच्या तयारीत असून काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचं चित्र आहे. 

भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी 4 लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. 

कोणत्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता (BJP Vidarbha Candidate List) 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या जागी परिणय फुके यांना भाजप रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. 

रामटेकमध्ये भाजप नवीन प्रयोग करत असून काँग्रेसमधून  एका आमदाराला आयात करून त्याला तिकीट देण्याची शक्यता आहे. 

यवतमाळ वाशीममध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून भावना गवळी यांच्या जागी संजय राठोड लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता

गडचिरोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून धर्माबाब आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर उतरवण्याच्या तयारीत आहे. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts