४ हात, ४ पाय, २ हृदयं आणि १ डोकं… छपराच्या नर्सिंग होममध्ये एका विचित्र बाळाचा जन्म, पाहायला लोकांची गर्दी – a strange baby girl born with four 4 hands in bihar died after about 20 minutes in chhapra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छपरा : बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने ४ हात, ४ पाय आणि १ डोके असलेल्या एका विचित्र बाळाला जन्म दिला. यानंतर ही मुलगी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनली. महिलेने काल रात्री उशिरा एका मुलीला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही वेळातच या विचित्र बाळाचा मृत्यू झाला. हे प्रकरण छपरा शहरातील श्याम चक येथील एका नर्सिंग होमशी संबंधित आहे. येथे महिला प्रिया देवी यांनी एका विचित्र बाळाला जन्म दिला.बालकाची माहिती रुग्णालयात उपस्थित कर्मचारी व रुग्णांना मिळताच तो लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मुलाला एक डोके, चार कान, चार पाय, चार हात, दोन हृदय आणि दोन पाठीचे कणे आहेत. मुलाच्या जन्मानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Cabinet Decisions: मंत्रिमंडळाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल; वाचा महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर
डॉक्टरांनी सांगितले असे मूल का जन्मले

महिलेच्या ऑपरेशननंतर मुलीला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी मुलगी जिवंत होती, असे सांगण्यात येत आहे. सुमारे २० मिनिटांनंतर त्याचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयाचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी सांगितले की, हे फार कमी लोकांमध्ये दिसून येते. असे घडते जेव्हा गर्भाशयात एकाच अंड्यापासून दोन मुले तयार होतात. या प्रक्रियेत दोन्ही मुले वेळेत विभक्त झाली तर जुळी मुले जन्माला येतात. काही कारणाने दोघे वेगळे होऊ शकले नाहीत तर अशी मुले जन्माला येतात. अशा बालकांच्या जन्माच्या वेळी जन्म देणाऱ्या महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Suresh Raina: आता मिस्टर IPL परदेशी टी-२० लीगमध्ये करणार कमाल, सुरेश रैनाचे क्रिकेटमध्ये पुनरागमन!
जन्माच्या २० मिनिटांनंतर बाळाचा मृत्यू

डॉक्टर अनिल कुमार यांनी सांगितले की, बाळाचा जन्म ऑपरेशनद्वारे झाला आहे. जन्मानंतर २० मिनिटांनंतर बाळाचा मृत्यू झाला. बाळंतीण पीडित महिलेचे हे पहिलेच मूल असल्याचे त्यांनी सांगितले. मुदत संपल्यानंतर मुलाच्या जन्माची चिंता त्यांना सतावत होती. तपासणीनंतर ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला. सध्या बाळाला जन्म देणारी महिला निरोगी असून तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मित्राची बर्थडे पार्टी दूरच राहिली, मध्येच तिघे अंघोळीसाठी नदीत उतरले, एकाचा बुडून मृत्यू, मित्र हादरले

[ad_2]

Related posts