IIT Dhanbad Professor Dies After Drowning In Swimming Pool; आयआयटी प्रोफेसरचा संशयास्पद मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रांची: झारखंडमधील आयआयटी-आयएसएम धनबादचे असिस्टंट प्रोफेसर यशवंत उजाला यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कॅम्पसच्या स्विमिंग पूलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. यशवंत उजाला त्यांच्या साथीदारांसह स्विमिंग करत होते. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे.मंगळवारी सकाळी यशवंत त्यांच्या मित्रांसोबत पूलमध्ये पोहत होते. तेव्हा ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले. त्यांना पूलमधून बाहेर काढून आयएसएमच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांना मृत घोषित केलं. यशवंत उजाला मूळचे ओडिशाचे रहिवासी होते. त्यांचा एक भाऊ आयआयटी राऊरकेलामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांच्या कुटुंबाला मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.
कुटुंबाला वाटलं देवाघरी गेला; पाच महिन्यांनंतर मेहुण्याला मोमोज खाताना सापडला अन् मग…
ओडिशाच्या बालासोरचे रहिवासी असलेले डॉ. यशवंत कुमार उजाला मंगळवारी नेहमीप्रमाणे स्विमिंगला गेले होते. खोल पाण्यात गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शिक्षण राज्यमंत्री यांचा आयआयटी-आयएसएम धनबादमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला. यशवंत कुमार त्यांच्या १६ मित्रांसोबत पूलमध्ये पोहायला गेले होते.

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास यशवंत कुमार कॅम्पसमधील पूलमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत १६ जण पूलमध्ये होते. पुलाची एक बाजू खोल होती. तिथली खोली १३ फूट होती. यशवंत पोहत पोहत खोल असलेल्या बाजूला गेले. त्यांच्या साथीदारांना काही कळण्याआधीच ते बुडाले. यशवंत यांना उत्तम स्विमिंग यायचं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
हातात दुर्बीण, कमरेला पिस्तुल; १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी झाडावर बसून काय करताहेत?
यशवंत कुमार बुडाल्याची बातमी कॅम्पसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यांना बाहेर काढून पीएमसीएचला नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यशवंत यांचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. उत्तम जलतरणपटू असलेल्या यशवंत यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. आसपास १६ साथीदार असताना यशवंत कसे काय बुडाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

[ad_2]

Related posts