Spotify Music Video spotify is testing full length music video service like youtube music marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Spotify Music Video : तुम्ही जर स्पोटिफाय (Spotify) यूजर आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Spotify एका फीचरवर काम करत आहे जे त्याच्या रोलआउटनंतर, यू ट्युबशी (YouTube) शी स्पर्धा करण्यास सक्षम असेल. खरंतर, आत्तापर्यंत तुम्ही Spotify चा वापर फक्त म्युझिक (Music) ऐकण्यासाठी करत असाल. पण, आता तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर म्युझिक व्हिडीओ पाहण्यासाठी देखील करू शकणार आहात अशी माहिती समोर आली आहे. 

Spotify त्याच्या प्लॅटफॉर्मवर म्युझिक व्हिडीओ फीचर  आणण्यासाठी चाचणी करत आहे. सध्या, कंपनीने काही प्रीमियम बीटा यूजर्ससाठी हे नवीन फीचर सादर केलं आहे. परंतु जर सर्व काही व्यवस्थित झाले तर, लवकरच कंपनी सामान्य यूजर्ससाठी देखील हे वैशिष्ट्य रोल आउट करू शकते.  

स्पॉटिफाई म्युझिक व्हिडीओ

Spotify मध्ये म्युझिक व्हिडीओ फीचर आणल्यानंतर YouTube ची स्पर्धा वाढणार आहे, कारण आतापर्यंत जगभरातील बहुतांश लोक कोणताही म्युझिक व्हिडीओ पाहण्यासाठी YouTube चा वापर करतात. मात्र, यूट्यूबवर केवळ म्युझिक व्हिडिओच नाही तर इतरही अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील, परंतु स्पॉटीफायवर कदाचित फक्त म्युझिक व्हिडिओच स्ट्रीम केले जातील.

Spotify ने या संदर्भात असे सांगितले आहे आहे की पूर्ण-लांबीच्या संगीत व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी सेवा सध्या यूके, नेदरलँड, पोलंड, स्वीडन, जर्मनी, इटली, ब्राझील, कोलंबिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि केनियामधील प्रीमियम बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीचे लक्ष्य आहे की त्यांना 2024 पर्यंत 1 अब्ज यूजर्स तयार करायचे आहेत. 

शॉर्ट्स सेवाही सुरू करण्यात आली

Spotify चे हे नवीन फीचर लाँच केल्यानंतर YouTube आणि Apple Music यांच्यात स्पर्धा होणार आहे, कारण या दोन्ही प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते Spotify कडे आकर्षित होऊ शकतात. गेल्या वर्षी, स्पॉटीफायने YouTube सारखी एक छोटी व्हिडीओ सेवा देखील सुरू केली होती, ज्याद्वारे यूजर्स 30 सेकंदांपर्यंत त्यांचे स्वतःचे व्हिडीओ तयार करू शकतात आणि ते स्पॉटीफायवर अपलोड करू शकतात.  

अशा परिस्थितीत, Spotify च्या नवीन योजना पाहता, असे दिसते की कंपनी 2030 पर्यंत एक अब्ज यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही मोठे आणि महत्त्वाचे बदल करू शकते किंवा नवीन सेवा आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

Apple iphone Screen : आयफोनच्या हँडसेटमधील वेळ नेहमी 9:41 का असते? जाणून घ्या इंटरेस्टिंग कनेक्शन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts