Eknath Khadse : ‘नाथाभाऊंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी’, अजित पवार गटाने खडसेंना डिवचलं!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार यांचा भाजपसोबत गेल्याने त्यांचा सन्मान राहिला नाही. त्यांना तीन जागांवरच समाधान मानावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. 

संजय पवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषदेत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या मताचा आदर करावा,आणि त्यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतरच अजित पवारांच्या सन्मानाची भाषा करावी. 

एकनाथ खडसेंनी शरद पवारांना धोका दिला

एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या सुनेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांना धोका दिला आहे. शरद पवारांना अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं आहे. त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी. एकनाथ खडसे यांची आमदारकी शाबूत राहत असून त्यांनी शरद पवारांना अंधारात ठेवले आहे. अजित पवार हे 45-50 आमदारांना सोबत घेऊन बाजूला झाले आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा धोका त्यांनी दिला नाही. 

खडसेंकडून स्वतःच्या कुटुंबासाठी सत्तेचा वापर

एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी सत्तेचा वापर केला. खडसे यांनी मंदा खडसे यांना चेअरमन, रोहिणी खडसे यांना चेअरमन, रक्षा खडसे यांना खासदार असे स्वतःच्याच घरात सर्व पदे त्यांनी घेतली आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, यांना दोघांना फसवले आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा द्यावा आणि सुनेचा प्रचार करावा. एकनाथ खडसे यांचे सीडीआर तपासण्यात यावे. मी शरद पवार व जयंत पाटील यांना अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

डॉ. सतीश पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून विरोध झाल्याचे दिसून आले. जळगावातील शरद पवार गटाचे नेते डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. खडसे अडचणीत असताना राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांनी त्यांना साथ दिली होती. आता पक्ष अडचणीत असताना त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देऊन साथ द्यायला पाहिजे होती. मात्र, आपल्या सुनेला सोयीचे होईल, अशा प्रकारची खडसे यांची भूमिका असल्याचे लोकांच्या मनात आहे. तेच आपल्यालाही वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Gulabrao Patil : ठाकरेंना का सोडलं? गुलाबराव पाटील म्हणाले, मी जाणार नव्हतो शिंदे साहेबांचा फोन आला अन्…

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts