Vasant More Meet Ravindra Dhangekar in dhnekar Office On Pune Loksabha 2024 election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याचा सल्ला आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) वसंत मोरेंना (Vasant More) दिला आहे. काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाऊन वसंत मोरे यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. दोघांची चांगली मैत्री आहे आणि दोघांनी यापूर्वी मनसेत चांगलं काम केलं आहे. आमदार धंगेकर आधी मनसेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे दोघे सुरुवातीपासून मित्र आहेत आणि आता दोन्ही नेते पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या दोघांच्या भेटीने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

या भेटीदरम्यान धंगेकरांनी वसंत मोरेंना अनेक सल्ले दिले. ते म्हणाले की, ‘आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. शिवाय वसंत मोरेंपेक्षा मी वयाने मोठा आहे. त्यांचं काम चांगलं आहे. मी पाहिलेलं आहे. त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यानंतर ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांनी डोकं शांत ठेवून सगळे निर्णय घ्यावेत आणि शिवाय त्यांना ज्या पक्षात प्रवेश करायचा आहे. त्यापक्षात प्रवेश करतानाही त्यांनी सगळा विचार करावा’

ठाकरे कुटुंबावर टीका करू नका!

धंगेकर पुढे म्हणाले की, ‘मी दोन तीन वर्षानी तात्या पेक्षा मोठा आहे, त्यांना राजकारण सांगत होतो, राजकारण सोप नाहीं, विचार करून निर्णय घ्यावा असा सल्ला दिला. आपल्याला ज्या पक्षाने मोठ केलं त्या पक्षावर किंवा त्या ठाकरे कुटुंबावर टीका करू नका’, असंही धंगेकरांनी वसंत मोरेंना सांगितलं. 

वसंत मोरे काय म्हणाले?

वसंत मोरे म्हणाले की, धंगेकर हे माझे गुरू आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळं त्याच मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असल्याचं वसंत मोरे म्हणाले. धंगेकर हे पुणे शहरासाठी काम करतात. पुणे शहर कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित आणि सुंदर ठेवायचं आहे. त्यासोबतच आरोग्य व्यवस्था नीट ठेवायची आहे. आमच्या दोघांचाही हेतू सारखा आहे. धंगेकर हे तीन वर्षांपासून काम करत आहेत आणि मी 15 वर्षांपासून काम करत आहे. आमचं पुण्यावर प्रचंड प्रेम असल्याचंही ते म्हणाले.

इतर महत्वाची बातमी-

Lok Sabha Election 2024 Maharashtra District wise voting dates : लोकसभा निवडणुकीला तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? सर्व मतदारसंघाचा आढावा एकाच ठिकाणी!

Lok Sabha Election 2024 Result : तुमच्या खासदाराला गुलाल कधी लागणार? लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख ठरली!

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts