In the presence of Chief Minister Eknath Shinde MLA of the Thackeray faction Amsha Padvi and some corporators will join the Shiv Sena Shinde Faction

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amsha Padvi Joins Shinde Faction : ज्यांना भरभरून दिलं त्यांनीच सोडून जाण्याचा प्रकार अजूनही ठाकरे गटामध्ये (Uddhav Thackeray) सुरूच आहे. ज्या आमश्या पाडवी (Amsha Padvi) यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमदार करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, तेच आमच्या पाडवी आता ठाकरे यांना पाठ दाखवून शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार आहेत. आज (17 मार्च) आमश्या पाडवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश होईल. यासह काही नगरसेवकांचा सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश नंदनवन बंगल्यावर होणार आहे. 

उद्धव ठाकरेंकडून बड्या नेत्यांना बाजूला करत उमेदवारी

गेल्या काही दिवसांपासून आमश्या पाडवी शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे चर्चा रंगली होती. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ते ओळखले जातात. 2022 मध्ये विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांना बाजूला करत आमच्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत निवडून आणले होते. यासाठी त्यांनी पक्षातील नाराजी सुद्धा ओढवून घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडाळी त्यावेळीच केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत चाळीस आमदार गेले होते. मात्र पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. 

विधानसभेला दोनवेळा पराभव

मात्र आता ते शिंदे गटात जात असल्याने भूवया उंचावल्या गेल्या आहेत. आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीमध्ये मोठे योगदान दिलं होतं. पाडवी यांचा गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये झालेली निवडणुकीमध्ये पाडवी यांनी 80 हजार मते घेतली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts