MVA Meeting Lok Sabha Election 2024 Mahavikas Aghadi on Seat Allocation Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MVA Meeting : वंचितला सोबत न घेता निवडणूक लढण्यावर मविआचा विचार सुरू, मविआच्या सुत्रांची माहिती 
आगामी लोेकसभा निवडणूक वंचितला सोबत न घेता लढवण्यावर महाविकास आघाडीत विचार सुरू झाला आहे. याचं कारण म्हणजे वंचितनं तब्बल १७ जागा मागितल्यानं मविआची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण वंचितला १७ जागा दिल्या तर तीन प्रमुख पक्षांच्या वाट्याला केवळ १०-१० जागा येतील. या तीन पक्षांना ते मान्य होणं शक्यच नाहीये. त्यामुळे वंचितला सोबत न घेताच निवडणूक लढवावी का, यावर गांभीर्यानं विचार सुरू आहे. काँग्रेसला १८ ते २० जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० ते १२ जागा आणि उर्वरित जागा ठाकरे गट, राजू शेट्टी आणि अन्य पक्षांना देण्यावर विचार सुरू आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Related posts