ipl 2024 punjab kings probable playing 11 shikhar dhawan first match against delhi capitals

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2024 : आयपीएलच्या महासंग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील लढतीने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. प्रत्येक संघाने कॅम्प लावले असून कसून सरावाला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक संघामध्ये मोठे बदल झाले आहेत, नवे खेळाडू संघात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघामध्येही यंदा बदल निश्चित मानले जातेय. यंदाच्या हंगामात शिखर धवन कोणत्या 11 खेळाडूसह मैदानात उतरु शकतो, याबाबत जाणून घेणार आहोत. 

शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघाने कसून तयारी सुरु केली आहे. गतवर्षीचा आयपीएल हंगामात पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. पण आता पंजाबचा संघ पुन्हा एकदा पुढील हंगामासाठी सज्ज झालाय. पंजाबचा पहिला सामना दिल्लीविरोधात 23 मार्च रोजी होणार आहे. पंजाब संघाच्या प्लेईंग 11 मध्ये जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन यासारख्या खेळाडूंना स्थान निश्चित मानले जातेय. 

हर्षल पटेल अन् सॅम करन पंजाबची जमेची बाजू – 

हर्षल पटेल याला पंजाबनं तब्बल 11.75 कोटींची रक्कम देत संघात घेतलेय. हर्षल पटेलची बेस प्राईज फक्त दोन कोटी इतकी होती, त्याला पंजाबनं 11.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेय. हर्षल पटेल पंजाबसाठी गेम चेंजर ठरु शकतो. गेल्या हंगामात आरसीबीकडून खेळताना हर्षल पटेलने 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी 2022 मध्ये 15 सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी राहिली. अष्टपैलू सॅम करनही पंजाबची सर्वात मोठी ताकद ठरेल.  त्याने गेल्या हंगामात 14 सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या, त्याशिवाय फलंदाजी करताना 276 धावांचा पाऊस पाडला होता.  

2023  मध्ये निराशाजनक कामगिरी – 

गतवर्षीचा आयपीएल हंगामात पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. गुणतालिकेत पंजाबचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता. पंजाबला फक्त सहा सामन्यात विजय मिळवता आला तर आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबला सनरायजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, आरसीबी, लखनौ, मुंबई , कोलकाता आणि दिल्लीने पराभूत केले होते. आता पंजाब यंदाच्या हंगामात दिल्लीसोबत पहिला सामना होणार आहे.  .

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग 11 : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, ऋषि धवन, हर्षल पटेल,  रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

किंग्स पंजाबच्या ताफ्यात कोण कोण ? 

प्रभसिमरन, शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन,कगिसो रबाड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, ऋषी धवन, हर्षल पटेल, हरप्रीत भाटिया, राइली रुसो, शशांक सिंह, क्रिस वोक्स, विश्वनाथ प्रताप सिंह, आशुतोष शर्मा, तनय त्यागराजन, सिकंदर रजा, शिवम सिंह, प्रिंस चौधरी, हरप्रीत ब्रार, नाथन एलिस आणि विदवत कावेरप्पा 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts