Election Commission of India launches 27 apps and portals for lok sabha elections Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Election Commission of India : नुकत्याच (16 मार्च 2024) रोजी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा म्हणजेच 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान निवडणुका जाहीर केल्या आहेत. या दरम्यान ECI ने सांगितले की ते या लोकसभा निवडणुकीत टेक्नॉलॉजीचा कसा फायदा घेतील .

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी घोषणा केली आहे की समिती मतदान प्रक्रिया लोकांसाठी सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी 27 ॲप्स आणि पोर्टल्स सादर केले जात आहेत.

ECI कडून पोर्टल आणि ॲप लाँच 

ECI ने व्होटर्स हेल्पलाईन (VHA) ॲप जाहीर केले आहे जे मतदान केंद्राचे तपशील पाहणे आणि ऑनलाइन फॉर्मसाठी अर्ज करणे सोपे करेल. हे मतदारांना त्यांच्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स (ERO) यांच्याशी जोडण्यात मदत करेल. यामुळे मतदारांना त्यांचे e-EPIC (इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र) डाउनलोड करता येणार आहे. व्होटर हेल्पलाइन ॲप आता गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याशिवाय, भारतीय निवडणूक आयोगाने cVigil नावाचे ॲप देखील लाँच केले आहे, जे नागरिकांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि निधीच्या वापराची तक्रार करण्याची सुविधा प्रदान करेल. कोणत्याही उल्लंघनाचे रेकॉर्डिंग, अहवाल आणि निराकरण करण्यासाठी हे एकमेव ॲप आहे.

हे यूजर्सना 100 मिनिटांची प्रतिसाद टाईमलाईन देते. त्याची खास गोष्ट म्हणजे ती कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार पूर्णपणे गुप्त ठेवते. cVigil ॲप Google Play Store वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.

केवायसी पोर्टलचे कार्य काय असेल?

याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी ECI ने KYC पोर्टल देखील सुरू केलं आहे. या पोर्टलवर, मतदारांना त्यांच्या उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड यांसारख्या गोष्टींचा संपूर्ण तपशील पाहता येईल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्व राजकीय पक्षांना त्यांची सर्व माहिती अशा सर्व पोर्टल्स आणि ॲप्सवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

मतदारांसाठी सर्व माहिती पारदर्शक व्हावी हा या पोर्टलचा उद्देश आहे. याशिवाय, समितीने सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुविधा पोर्टलही सुरू केले आहे. उमेदवार कोणत्याही सभा, रॅली इत्यादीसाठी परवानगी घेण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या :

Voter ID Card : निवडणुका जाहीर झाल्या तरी Voter ID नाही? चिंता सोडा, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts