Prakash Ambedkar says How can a company with a profit of 200 crores pay 1300 crores in election bonds Ambedkar question to Modi Shah INDIA alliance rally in Mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : इंडिया आघाडीच्या पहिल्याच सभेतून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांवरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. 200 कोटींचा नफा असणारी कंपनी 1300 कोटींचे निवडणूक रोखे कशी देईल? असा थेट सवाल आंबेडकरांनी मोदी शाहांना केला. 

जेव्हा कंपनीचा नफा 200 कोटी आहे, तेव्हा त्यांनी 1300 कोटींचे बाँड कोठून विकत घेतले? 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला समजते तिथपर्यंत आपण लढले पाहिजे, एकत्र लढले पाहिजे, एकटे लढले पाहिजे परंतु  लढलं पाहिजे. बंगालमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात प्रयत्न केले जात आहेत की आपण सर्व मिळून सर्व शक्तीनिशी लढू.  ते पुढे म्हणाले की, निवडणूक रोख्यांवर अमित शाहांचे विधान प्रत्येक चॅनेलवर येत आहे की आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढला आहे, पण मला मोदीजी आणि अमित शहा यांना विचारायचे आहे, फ्युचर इज गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस कंपनी कोणाची? निव्वळ नफा 215 कोटींचा आहे आणि त्यांनी 1360 कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड्स खरेदी केले आहेत. जेव्हा कंपनीचा नफा 200 कोटी आहे, तेव्हा त्यांनी 1300 कोटींचे बाँड कोठून विकत घेतले याचे वर्णन असावे. आम्ही त्यांना टार्गेट करणार की नाही? हा प्रश्न आम्ही मोदींना विचारू की नाही? याचा खुलासा त्यांनी करावा. 

या कंपनीकडे 1300 कोटी रुपये कुठून आले याचे उत्तर दिले पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की, प्रियंका गांधीजींना माझी नम्र विनंती आहे की मोदीजी म्हणतात की, हा देश माझा परिवार आहे. हा देश त्यांचे कुटुंब आहे हे खरे आहे, पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्यासोबत राहत नाही. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनाही विनंती करतो की त्यांनी हा मुद्दा उपस्थित करावा आणि हिंदू समाजातील कौटुंबिक नाते हे सर्वात घट्ट नाते आहे. मोदीजींनी ते नाते कायम ठेवावे आणि आपल्या पत्नीला सोबत ठेवावे. दोन-चार दिवस बाकी आहेत, त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे, मला आशा आहे की याबद्दल बोलतील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts